Sangli Murder : सांगलीत बुर्जी करण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, गाडीचीही तोडफोड

शंभर फुटी रोडवरील चेतना पेट्रोल पंप नजीक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या समोरच्या बाजूला माऊली एग्ज जंक्शन नावाचा बुर्जीचा स्टॉल आहे. या स्टॉलवर दोन युवक आले होते. या युवकांचा बुर्जी स्टॉलचा मालक संतोष पवार याच्याशी वाद झाला. याच वादातून या दोघांनी बुर्जीच्या गाडीची तोडफोड करण्यास सुरुवात केली.

Sangli Murder : सांगलीत बुर्जी करण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, गाडीचीही तोडफोड
सांगलीत बुर्जी करण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 11:32 PM

सांगली : अंडा बुर्जी करण्याच्या वादातून एका हातगाडी चालकाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना सांगलीत उघडकीस आली आहे. संतोष तुकाराम पवार (28 रा. मोती चौक सांगली) असे हत्या करण्यात आलेल्या हातगाडी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसा (Vishrambaug Police)त हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्या संतोषला शेजाऱ्यांनी तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र पोलिसांनी त्याला मृत घोषित केले. आरोपींनी संतोषला मारहाण (Beating) करत हातगाडीची तोडफोड केली आहे. त्यानंतर ते घटनास्थळावरुन फरार झाले.

गाडीच्या तोडफोडीस विरोध केल्याने तरुणावर हल्ला

शंभर फुटी रोडवरील चेतना पेट्रोल पंप नजीक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या समोरच्या बाजूला माऊली एग्ज जंक्शन नावाचा बुर्जीचा स्टॉल आहे. या स्टॉलवर दोन युवक आले होते. या युवकांचा बुर्जी स्टॉलचा मालक संतोष पवार याच्याशी वाद झाला. याच वादातून या दोघांनी बुर्जीच्या गाडीची तोडफोड करण्यास सुरुवात केली. संतोषने याला विरोध केला असता आरोपींपैकी एकाने चाकू काढला आणि संतोषच्या पोटात खुपसला. चाकूने वार केल्यानंतर संतोष जमिनीवर कोसळला. संतोषला खाली पडलेला पाहून आरोपींनी तेथून पळ काढला. शेजाऱ्यांनी तात्काळ जखमी संतोषला वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात नेले मात्र तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपींचा शोध सुरु

याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांना हत्येची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरिक्षक के. एस. पुजारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून उपस्थितांना सूचना दिल्या. दरम्यान ही हत्या किरकोळ कारणातून झाली की पूर्ववैमनस्यातून याबाबत विश्रामबाग पोलीस तपास करत आहेत. सध्या आरोपींच्या शोधाकरीता पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करीत आहेत. लवकर आरोपींना अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. (Burji stall owner brutally murdered in Sangli for minor dispute)

हे सुद्धा वाचा

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.