Gondia Police : डायल 112 वर तब्बल 110 वेळा कॉल करून दिली खोटी माहिती, गोंदियातील महिलेस 6 महिन्यांची शिक्षा

संबंधित महिला खोटी बोलत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल करून प्रकरण कोर्टात गेलं. न्यायालयानं तिला शिक्षा सुनावली. पोलिसांनी योग्य पद्धतीनं तपास केला.

Gondia Police : डायल 112 वर तब्बल 110 वेळा कॉल करून दिली खोटी माहिती, गोंदियातील महिलेस 6 महिन्यांची शिक्षा
गोंदियातील महिलेस 6 महिन्यांची शिक्षा Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 2:08 PM

गोंदिया : डायल 112 वर कॉल करून खोटी माहिती दिल्यास महागात पडू शकते. होय हे खरे आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव (Arjuni Morgaon) तालुक्यातील एका महिलेने 9 दिवसांत तब्बल 110 वेळा डायल 112 वर कॉल केला. वरून खोटी माहिती दिली. हे तिला चांगलेच महागात पडले. तिला सहा महिन्यांसाठी कारावासात जावे लागले. एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून (Mobile no) पोलिसांच्या डायल 112 या क्रमांकावर वारंवार कॉल येत होते. एका लहान मुलाचा मर्डर झाला आहे. त्वरित पोलीस मदत पाठवा. अशी माहिती दिली जात होती. नंतर तो मोबाईल बंद करण्यात येत होता. त्या महिलेने 9 दिवसात तब्बल 110 वेळा डायल 112 वर कॉल करून खोटी दिली. पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम (Police Inspector Somnath Kadam) यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले.

दहा दिवसांत प्रकरण निकाली

चौकशी केली असता, ती महिला पोलिसांना खोटी माहिती देत असल्याचे निष्पन्न झाले. अवघ्या दहा दिवसांत हे प्रकरण न्यायालयासमोर आले. अर्जुनी मोरगाव प्रथम सत्र न्यायालयाने त्या खोटारड्या महिलेला पाचशे रुपये दंड आणि सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. डायल 112 वर कॉल करून खोटी माहिती देणे त्या महिलेला चांगलेच भोवले आहे. ठाणेदार, अर्जुनी मोरगाव पो. स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ कदम म्हणाले, कॉल केल्यानंतर पोलीस जात होते. पण, तसं काही घडलेलं राहत नव्हते. त्यामुळं त्यांनी सखोल चौकशी केली. संबंधित महिला खोटी बोलत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल करून प्रकरण कोर्टात गेलं. न्यायालयानं तिला शिक्षा सुनावली. पोलिसांनी योग्य पद्धतीनं तपास केला. त्यामुळं आता अशी खोटी माहिती देणाऱ्यांवर वचक बसणार आहे, असंही कदम यांनी सांगितलं.

दिशाभूल करणाऱ्या महिलेला शिकविला धडा

महाराष्ट्र पोलिसांनी कुणावर अन्याय, अत्याचार, चोरी, मारहाण आणि गुन्हेगारीवर त्वरीत आळा बसावा यासाठी डायल 112 प्रणाली सुरू केली. मात्र, त्याही प्रणालीचा दुरूपयोग करून संबंधित महिलेने तब्बल 110 वेळा कॉल करीत खोटी माहिती दिली. पोलीसांची दिशाभूल करीत त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. डायल 112 ही प्रणाली नागरिकांच्या सोयीसाठी केलेली आहे. पण, पोलिसांना त्रास होत असेल, तर ते त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत. सोमनाथ कदम यांनी सहा महिन्यांपूर्वी चार्ज घेतला. तेव्हापासून या भागात गुन्ह्याचं प्रमाण कमी आहे. पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या महिलेलाही त्यांनी धडा शिकविला आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.