15 लोकांची शिकार करणारा नरभक्षी वाघ जेरबंद, बेशुद्धीचे दिले इंजेक्शन
13 ऑक्टोबरच्या सकाळी या वाघाला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात आले.

इरफान मोहम्मद, TV9 मराठी, प्रतिनिधी, गडचिरोली : भंडारा जिल्हासह गडचिरोली, गोंदिया, नागपूर जिल्ह्यात 15 लोकांची शिकार करण्याऱ्या नरभक्षी सी टी 1 नरभक्षी वाघाला गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा येथे जेरबंद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गडचिरोलीतील 6, गोंदिया 2, भंडारा जिल्ह्यात 4, चंद्रपूर 3 लोकांचा या नरभक्षी वाघाने फडशा पाडला होता. एकूण 15 लोकांना या वाघाने ठार केले. मागील महिन्याभरापासून या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या टीम जंगलात ठाण मांडून बसल्या होत्या. मात्र पावसामुळे वाघाला जेरबंद करण्यात कुठेतरी अडथळा निर्माण होत होता. मात्र आज सकाळी वनविभागाच्या सापळ्यात अडकताच शूटरने बेशुद्धीच इंजेक्शन देऊन नरभक्षक वाघाला अखेर जेरबंद करण्यात यश आले. यामुळं नागरिकांनी अखेर सुटकेचा निःश्वास घेतला आहे.
टायगर अभी पिंजरे मे बंद अशी माहिती पडताच गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज शहरात नागरिकांची गर्दी उमटली. या नरभक्षक वाघाने जवळपास 15 नागरिकांचे बळी घेतले आहेत.
टायगर अभी पिंजरे मे बंद अशी माहिती पडताच गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज शहरात नागरिकांची गर्दी उमटली. या नरभक्षक वाघाने जवळपास 15 नागरिकांचे बळी घेतले आहेत.
देसाईगंज आणि आरमोरी या तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचा बळी या नरभक्षक वाघाने हल्ला करून घेतला. सिटी-१ या नरभक्षक वाघाने गेल्या काही महिन्यात गडचिरोलीसह भंडारा, चंद्रपूर, तीन जिल्ह्यांत धुमाकूळ घातला होता.
काही दिवसापासून वन विभागाचे दोन पथक देसाईगंज आणि आरमोरी भागात वाघाला जेरबंद करण्याचे प्रयत्न करीत होते. आज 13 ऑक्टोबरच्या सकाळी या वाघाला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात आले.
चामोर्शी, आरमोरी, गडचिरोली या भागात बिबट्या आणि वाघाची दहशत नेहमीच कायम असतो. या वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत जवळपास 27 नागरिक ठार झाले असल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार अशोक नेते यांनी पालकमंत्र्यांना समोर दिली.
मृतक शेतकऱ्यांना ताबडतोब मदत देण्यात यावी आणि ही मदत मोठ्या स्वरुपात देण्यात यावी, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती.
अखेर CT-1 नावाचा एक वाघ जेरबंद झाला तरी नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकर्यांचे अनेक कुटुंब उध्वस्त झालेत. या उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला शासनाकडून अद्याप मदत मिळालेली नाही.
ठार झालेल्या शेतकर्यांचे अनेक शेतकरी शेतीत चांगला पीक काढण्याच्या उद्देशाने किंवा जंगलातून काही औषध आणण्याच्या उद्देशाने जंगलात गेले. पण, या वाघाच्या हल्ल्यातून परतलेच नाही.