चंद्रपुरात थरारक अपघात, आठवडी बाजारात घुसली कार, एकाचा मृत्यू, चार जखमी

जिल्ह्यातील सावली येथील आठवडी बाजारात एक कार घुसल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (दि 21) रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

चंद्रपुरात थरारक अपघात, आठवडी बाजारात घुसली कार, एकाचा मृत्यू, चार जखमी
chandrapur car accident
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 7:48 PM

चंद्रपूर : जिल्ह्यातील सावली येथील आठवडी बाजारात एक कार घुसल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले. आज (दि 21) दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मार्कंडी शंकर मोहूर्ले (70) रा. खेडी असे मृतकाचे नाव असून दशरथ कावरु, सोमेश्वर डोमाजी मोहूर्ले कांताबाई कन्नाके, छायाबाई काले हे चार जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

कार भरधाव वेगाने असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले

मिळालेल्या माहितीनुसार MH 34 A 0375 ही चारचाकी मारुती कार सिंदोळा मार्गावरून सावलीकडे येत होती. आज सावली येथील आठवडी बाजाराचा दिवस असल्याने रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यावरून कार भरधाव वेगाने असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व कारने फळांच्या रिक्षाला धडक दिली. कारने चक्क पाच नागरिकांना चिरडले. पाचही जखमींना सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेत खेडी येथील मार्कंडी शंकर मोहूर्ले याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तर गंभीर जखमींना पुढील उपचाराकरिता गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.

आठवडी बाजारात नागरिकांची प्रचंड गर्दी

सावली हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने येथे ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. येथे आठवडी हरांबा मार्गावर भरतो. आठवडी बाजाराच्या दिवशी येथे प्रचंड गर्दी असते. प्रवाशांना तसेच बाजार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यात ही घटना घडल्यामुळे नागरिकांत रोष निर्माण झाला आहे. भरधाव वेगात बेजबाबदारपणे कार चालवणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करवी अशी मागणी नागरिक करत आहेत.

पुण्यात तरुण तरूणीचा अपघातात मृत्यू

दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथे 17 ऑक्टोबर रोजी अंगाचा थरकाप उडवणारा एक अपघात झाला होता. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पुण्याहून मुंबईकडे जाताना आकुर्डी येथे भरधाव वेगात आलेली दुचाकी दुभाजकावर थेट धडकली होती. या अपघातात दुचाकीवर स्वार असलेल्या आर्यन परमार आणि श्वेता गजबे यांचा मृत्यू झाला होता. तर अन्य दोन दुचाकीस्वार तरुणी जखमी झाल्या होत्या.

नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या दुभाजकावर थेट आदळले

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात आकुर्डी येते झाला. अपघात झालेल्या दुचाकीवर एक तरुण आणि तरुणी प्रवास करत होते. ही दुचाकी भरधाव वेगात जात होती. यावेळी नियंत्रण सुटल्यामुळे दोघेही रस्त्याच्या दुभाजकावर थेट आदळले. यातच त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये दुचाकीनेही थेट पेट घेतला. आर्यन परमार आणि श्वेता गजबे असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

इतर बातम्या :

नवाब मलिक म्हणाले, समीर वानखेडेची नोकरी जाणार, जेलमध्ये टाकणार, आता वानखेडेंचं थेट उत्तर

china covid cases 2021: चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार, विमान फेऱ्या रद्द, शाळा बंद, जागोजागी मास टेस्टिंग सुरु

निव्वळ व्हॉट्सअ‌ॅप चॅटवरुन आर्यन, अनन्या अडकणार? उज्ज्वल निकम म्हणतात, प्रमोद महाजन खून खटल्यातही एक मेसेज होता

(car entered in market one dead four injured in chandrapur district)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.