कोल्हापूरची कोरोना परिस्थिती नियंत्रणात येईना, थेट केंद्राचं पथक दाखल, आरोग्य यंत्रणेची झाडाझडती घेणार!

जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती अजूनही नियंत्रणात येत नसल्याने याची दखल आता थेट केंद्राने घेतली आहे. केंद्राचं एक पथक आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. | kolhapur Corona Update

कोल्हापूरची कोरोना परिस्थिती नियंत्रणात येईना, थेट केंद्राचं पथक दाखल, आरोग्य यंत्रणेची झाडाझडती घेणार!
Kolhapur CPR Hospital
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 8:40 AM

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती अजूनही नियंत्रणात येत नसल्याने याची दखल आता थेट केंद्राने घेतली आहे. केंद्राचं एक पथक आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून हे पथक जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढाव घेणार आहे.

चार सदस्यीय हे पथक दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाशी सोबत घेऊन केलेल्या उपाययोजनांची माहिती घेणार आहे. त्याचबरोबर काही खाजगी हॉस्पिटल, त्याचबरोबर लसीकरण केंद्रांना देखील भेटी देणार आहे.

कोल्हापूरची कोरोना परिस्थिती नियंत्रणात येईना

देशात आणि राज्यात बहुतांश ठिकाणी कोरूना परिस्थिती नियंत्रणात येत असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र परिस्थिती अजूनही गंभीर आहे. दिवसाला अजूनही एक हजार ते पंधराशे नवे रुग्ण आढळत असून पॉझिटिव्हिटी रेट 17 टक्क्यांहून अधिक आहे. एका बाजूला राज्यात तिसरा लाटेची शक्यता वर्तवली जात असतानाच कोल्हापूर जिल्हा मात्र अजूनही दुसऱ्या लाटेतून मुक्त झालेला नाही.

आरोग्य यंत्रणेची झाडाझडती

कोल्हापुरातील या रुग्ण वाढीच्या आणि मृत्यू दराच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न हे पथक करणार आहे. रोजचे टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, ऑक्सिजन पुरवठा, आयसीयू बेडची स्थिती, व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता, तिसर्‍या लाटेसाठी केलेली तयारी याची सविस्तर माहिती प्रशासनाला या पथकाला द्यावी लागणार आहे. त्यामुळे हे पथक येणार असल्याची सूचना मिळताच आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.

पथकात कुणाचा समावेश

कोल्हापुरात येणाऱ्या केंद्रीय पथक चार सदस्यांचा समावेश आहे. गृह व नगरविकास विभागातील सहसचिव कुणाल कुमार या पथकाचे नोडल ऑफिसर आहेत. याशिवाय राष्ट्रीय साथ नियंत्रण केंद्राचे उपसंचालक डॉ. अजित शेवाळे, कुटुंब कल्याण विभागाचे पुणे प्रादेशिक विभागाचे उपसंचालक डॉ. प्रणित कांबळे आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स विभागाचे सहसंचालक डॉ सत्यजित साहू यांचा यात समावेश आहे.

(Central Govt Squad in Kolhapur over increasing Corona Patient Day by Day)

हे ही वाचा :

सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझर सक्तीचा, अन्यथा फौजदारी कारवाई होणार, कोल्हापूरमध्ये कडक निर्बंध

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.