ठाकरे सरकारनं कोरोनाकाळात एक मास्क विकत घेतला नाही, चेक हातात घेऊन फिरले, सगळा पैसा केंद्रानं दिला, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

कोरोनात महाविकास आघाडी सरकारने जनतेला आवळा दिला.सगळा निधी केंद्राने दिला, यांनी एक मास्क देखील विकत घेतला नाही, केवळ चेक हातात घेऊन फिरत होते, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

ठाकरे सरकारनं कोरोनाकाळात एक मास्क विकत घेतला नाही, चेक हातात घेऊन फिरले, सगळा पैसा केंद्रानं दिला, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला
चंद्रकांत पाटील, उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 12:23 PM

कोल्हापूर: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलातना महाविकास आघाडी सरकारवर कोरोनावरुन निशाना साधलाय. कोरोनात महाविकास आघाडी सरकारने जनतेला आवळा दिला.सगळा निधी केंद्राने दिला, यांनी एक मास्क देखील विकत घेतला नाही, केवळ चेक हातात घेऊन फिरत होते, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

राज्यात मुख्यमंत्री बदलले काय?

राज्यात मुख्यमंत्री बदलले काय? घोषणा मुख्यमंत्र्यांनी करायची असते.शरद पवार कसे काय घोषणा करतात.उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांबाबात घोषणा केली पाहिजे. एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासह रस्त्यावर उतरू, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र

संजय राऊत यांनी काय म्हणायचं हा त्यांचा निर्णय आहे. पोटनिवडणुकीत एकूण जागा जास्त भाजपनं जिंकल्या आहेत.संजय राऊत हे दुर्बीण घेऊन बसले आहेत. कुठं छिद्र आहे हे बरोबर शोधतात, संपूर्ण पोशाख ते बघत नाहीत, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. कलाबेन डेलकर यांचा विजय हा शिवसेनेचा विजय म्हणायचा का?, असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला केला आहे. 2024 ला परिस्थिती बदलेल असं संजय राऊत म्हणाले होते त्यावर त्यावेळी काय करायचे ते जनता ठरवेल, असं पाटील म्हणाले.

राज्यानं पेट्रोल डिझेलचे दर कमी करावेत

केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पन्न शुल्क कमी केल्यानंतर राज्य सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर आता कमी केले पाहिजेत, असं पाटील म्हणाले.14 राज्यांनी देखील दर कमी केले आहेत. महाराष्ट्र सरकारनं अजून निर्णयदेखील घेतलेला नाही. इंधनाबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेणार असेल तर आम्ही स्वागत करू असं पाटील म्हणाले. आम्ही कपटी नाही, पण माझं चॅलेंज आहे हे सरकार इंधनाचे दर कमी करणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

इतर बातम्या:

केंद्राने पेट्रोल डिझेल दरवाढ कमी केली, ठाकरे सरकार करणार का? शरद पवारांनी 5 शब्दात निकाल लावला!

गोविंदबागेतल्या पाडव्याला अजितदादांची दांडी, राज्यभरात चर्चेला उधाण, शरद पवारांनी खरं कारण सांगितलं!

Chandrakant Patil slam MVA Government said Union Government gave money during corona time

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.