संजय राऊत हे दुर्बीण घेऊन बसलेत, संपूर्ण पोशाखाऐवजी कुठं छिद्र आहे हे बरोबर शोधतात, चंद्रकांत पाटील यांचा टोला

| Updated on: Nov 05, 2021 | 12:07 PM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलातना महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधलाय. शिवसेना खासदार संजय राऊत आणि महाविकास आघाडी सरकारला पोटनिवटणुकांचा निकाल आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन धारेवर धरलंय.

संजय राऊत हे दुर्बीण घेऊन बसलेत, संपूर्ण पोशाखाऐवजी कुठं छिद्र आहे हे बरोबर शोधतात,  चंद्रकांत पाटील यांचा टोला
CHANDRAKANT PATIL
Follow us on

कोल्हापूर: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलातना महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधलाय. शिवसेना खासदार संजय राऊत आणि महाविकास आघाडी सरकारला पोटनिवटणुकांचा निकाल आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन धारेवर धरलंय. केदारनाथ येथील विकास कामांच्या पहिल्या टप्प्याचं आज लोकार्पण होतंय, तीन टप्प्यात विकास केला जाणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र

संजय राऊत यांनी काय म्हणायचं हा त्यांचा निर्णय आहे. पोटनिवडणुकीत एकूण जागा जास्त भाजपनं जिंकल्या आहेत.संजय राऊत हे दुर्बीण घेऊन बसले आहेत. कुठं छिद्र आहे हे बरोबर शोधतात, संपूर्ण पोशाख ते बघत नाहीत, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. कलाबेन डेलकर यांचा विजय हा शिवसेनेचा विजय म्हणायचा का?, असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला केला आहे. 2024 ला परिस्थिती बदलेल असं संजय राऊत म्हणाले होते त्यावर त्यावेळी काय करायचे ते जनता ठरवेल, असं पाटील म्हणाले.

राज्यानं पेट्रोल डिझेलचे दर कमी करावेत

केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पन्न शुल्क कमी केल्यानंतर राज्य सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर आता कमी केले पाहिजेत, असं पाटील म्हणाले.14 राज्यांनी देखील दर कमी केले आहेत. महाराष्ट्र सरकारनं अजून निर्णयदेखील घेतलेला नाही. इंधनाबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेणार असेल तर आम्ही स्वागत करू असं पाटील म्हणाले. आम्ही कपटी नाही, पण माझं चॅलेंज आहे हे सरकार इंधनाचे दर कमी करणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

राज्य सरकारनं एक मास्क दिला नाही

कोरोनात महाविकास आघाडी सरकारने जनतेला आवळा दिला.सगळा निधी केंद्राने दिला, यांनी एक मास्क देखील विकत घेतला नाही, केवळ चेक हातात घेऊन फिरत होते, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

तीन टप्प्यात केदारनाथचा विकास

केदारनाथ याठिकाणी 2013 साली आलेल्या आपत्तीनंतर याठिकाणी कुणी पोहचेल असं वाटत नव्हते. मात्र, आता हे सगळं हळूहळू पूर्ववत होत आहे.2013 साली मोदी केदारनाथला आल्यानंतर याठिकाणी सुविधा तयार करायच्या त्यांनी ठरवलं होतं. तीन टप्प्यात केदारनाथ चा विकास करण्याचं ठरवलं होतं. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झालं असून त्याचं लोकार्पण होत असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

राज्यात मुख्यमंत्री बदलले काय?

राज्यात मुख्यमंत्री बदलले काय? घोषणा मुख्यमंत्र्यांनी करायची असते.शरद पवार कसे काय घोषणा करतात.उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांबाबात घोषणा केली पाहिजे. एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासह रस्त्यावर उतरू, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

इतर बातम्या:

शिवसेनेनं रामदास कदम यांना भरपूर दिलं,ऑडिओ क्लिपचा विषय संपला, योगेश कदम यांचं विधानपरिषदेबाबत सूचक वक्तव्य

ईश्वराच्या कृपेनेच केदारनाथचा विकास, नरेंद्र मोदींनी सांगितला ‘शंकर’ शब्दाचा अर्थ

 

Chandrakant Patil slam Sanjay Raut Said he does not saw all picture