दारुड्या बाप मुलाच्या बाबतीत असा क्रूर का झाला, त्याने चिठ्ठीत लिहीलं, ह्रदयद्रावक घटनेनं चंद्रपूर हादरलं

| Updated on: Apr 09, 2023 | 1:48 PM

हा बाप दारुड्या होता. त्यामुळे दारुच्या नशेत त्याने पत्नी माहेरी गेल्याचा राग आपल्या तीन वर्षांच्या मुलावर काढला. त्यानंतर त्याला अतिशय वाईट वाटले.

दारुड्या बाप मुलाच्या बाबतीत असा क्रूर का झाला, त्याने चिठ्ठीत लिहीलं, ह्रदयद्रावक घटनेनं चंद्रपूर हादरलं
Follow us on

चंद्रपूर : चंद्रपुरात ह्रदयद्रावक घटना समोर आली. एका दारुड्या व्यक्तीने पत्नीशी भांडण केले. या भांडणाच्या रागातून पत्नी हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या माहेरी निघून गेली. जाताना तीन वर्षांच्या मुलाला त्याच्या बापाजवळ ठेवले. हा बाप दारुड्या होता. त्यामुळे दारुच्या नशेत त्याने पत्नी माहेरी गेल्याचा राग आपल्या तीन वर्षांच्या मुलावर काढला. त्यानंतर त्याला अतिशय वाईट वाटले. यासंदर्भात गणेशने चिठ्ठी लिहिली. त्या चिठ्ठीत त्याने त्याचं मनोगत व्यक्त केलं. हे सर्व पाहून चंद्रपूरकर हळहळले. विनाकारण चिमुकल्याचा बळी का घेतला, असा प्रश्न लोकांसमोर उपस्थित झाला आहे.

पत्नीला केली मारहाण

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातल्या राजोली येथे ह्रदद्रावक घटना घडली. गणेश विठ्ठल चौधरी (वय 31) हा आपल्या पत्नी काजल आणि मुलासह राजोली येथे राहात होता. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी त्याने मद्यधुंद होत पत्नीला मारहाण केली. त्यामुळे ती घरून निघून गेली. घरी स्वतः गणेश आणि मुलगा प्रियांशु राहात होते.

हे सुद्धा वाचा

चिठ्ठी लिहून मागितली माफी

रविवारी पहाटे 5 वाजता दरम्यान गणेशने दारूच्या नशेत मुलगा प्रियांशु याचा गळा दाबून खून केला. त्याआधी त्याने एक चिठ्ठी लिहून याबाबत माफी मागितली. स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

जखमी बापावर उपचार सुरू

माहिती मिळताच मूल पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. जखमी गणेश चौधरी याला उपचारासाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे पथक करीत आहे.

नानाभाऊच्या नावाने लिहिली चिठ्ठी

नानाभाऊ मी मेल्यावर माझ्या पोराचे काही भविष्य नाही. त्यामुळे त्याला संपवत आहे. नंतर मीसुद्धा मरणार आहे. त्यामुळे आम्हा दोघा बापलेकांना एकाच छकुलीवर नेजो. गूड बाय, आय लव्ह यू प्रियांशू, असा मुलाच्या नावाचा उल्लेख केलेली चिठ्ठी त्याने स्वतःवर वार करण्यापूर्वी लिहिली. पत्नी काजलला जिथं जायचं आहे तिथं जा म्हणा, असाही उल्लेख गणेशने चिठ्ठीवर केला आहे.