“वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करा”; ‘या’ मंत्र्याने दिले जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
वादळी वारा झाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांच्या घरांचे पत्रे उडून गेल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे.
चंद्रपूर : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नागरिकांच्या घरांचे आणि शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते. वादळी वाऱ्यामुळे अनेक नागरिकांना मोठा फटका बसला आहे. तर अनेकांच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आता प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. हे पंचनामे करताना कोणताही नागरिक त्यातून वगळला जाऊ नये अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत. जिल्ह्यात वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांच्या घरांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष मोक्यावर पंचनामे करून तात्काळ आपदग्रस्तांना मदत करण्याचे आदेश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
या वादळी वाऱ्यांमुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकरी, नागरिक यांच्या पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे. यांसदर्भात नुकसानीचे सर्व्हेक्षण करून पंचनामे करावे व नुकसान भरपाई तात्काळ अदा करण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी तातडीने चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशामुळे नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वादळी वारा झाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांच्या घरांचे पत्रे उडून गेल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे.
एकीकडे पावसामुळे शेतीच्या पिकांचे नुकसान तर दुसरीकडे शेतमालाला बाजारभाव मिळाला नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.सध्या मंत्री मुनगंटीवार यांच्या आदेशामुळे नुकसानग्रस्त नागरिकांसह शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान झाले आहे.