Chandrapur Fire | चंद्रपुरातल्या मामला जंगलात वणवा, शेकडो हेक्‍टर वनसंपदा आगीच्या विळख्यात; वन्यजीव, पशुपक्ष्यांना धोका

मामला येथे घनदाट जंगल आहे. याठिकाणी वन्यजीवांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. हा भाग बफर क्षेत्रात येतो. ब्लोअरनं आग विझविण्यात येते. पण, ही यंत्रणा सक्षम दिसत नाही. चंद्रपूर हा वनव्याप्त जिल्हा आहे. पण, त्यामानानं आग विझविणारी यंत्रसामुग्री अपुरी आहे.

Chandrapur Fire | चंद्रपुरातल्या मामला जंगलात वणवा, शेकडो हेक्‍टर वनसंपदा आगीच्या विळख्यात; वन्यजीव, पशुपक्ष्यांना धोका
चंद्रपुरातल्या मामला जंगलात वणवाImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 5:45 PM

चंद्रपूर : जिल्ह्यातील मामला जंगलात (Mamla forest) मोठा वनवणवा नजरेस पडला आहे. काल रात्रीपासून या परिसरामध्ये धुराचे प्रचंड लोट दिसत आहेत. चंद्रपूर-गडचिरोली (Chandrapur-Gadchiroli) राष्ट्रीय महामार्गाच्या लगतच शेकडो हेक्‍टरवर वनसंपदा आगीच्या विळख्यात सापडली आहे. प्राणी वन्यजीव व पशुपक्षी वणव्याच्या विळख्यात सापडले आहेत. गेल्या दोन महिन्यातला हा सर्वात मोठा वणवा असल्याची ग्रामस्थांची माहिती आहे. वनवणवा नियंत्रणात आणण्यासाठी गेले काही वर्ष वनविभागाचे (Forest Department) सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र मामला येथील वणव्याने हा दावा सपशेल फोल ठरलाय. तातडीने अधिक कुमक लावून वणवा नियंत्रणात आणण्याची गरज व्यक्त होत आहे.

वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात

मामला येथे घनदाट जंगल आहे. याठिकाणी वन्यजीवांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. हा भाग बफर क्षेत्रात येतो. ब्लोअरनं आग विझविण्यात येते. पण, ही यंत्रणा सक्षम दिसत नाही. चंद्रपूर हा वनव्याप्त जिल्हा आहे. पण, त्यामानानं आग विझविणारी यंत्रसामुग्री अपुरी आहे. जंगलाला लागलेल्या आगीमुळं वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात येतो. शिवाय रोपटे जळून खाक होतात.

आग लागली कशी

उन्हाळ्यात लोकं तेंदुपत्ता तोडायला जातात. त्यामुळं ते आग लावण्याची शक्यता असते. शिवाय मोहफुल वेचण्यासाठी झाडाखालील जागा स्वच्छ असावी लागते. त्यासाठी आग लावली जाण्याची शक्यता असते. दोन दिवसांपूर्वी चंद्रपूरचा पारा 46.8 अंश सेल्सिअस नोंदवलं होतं. उष्णतेमुळं ही आग लवकर पसरते. ही आग लवकर विझत नाही. झाडाच्या फांद्या तोडून डारांनी आग विझवली जात होती. फायर लाईन बनवली जात होती. शिवाय आग विरुद्ध दिशेनं लावायची म्हणजे आग विझत होती. पण, आता आधुनिक यंत्रणांचा वापर केला जातो. पण, ही यंत्रणा पुरेशा प्रमाणात नसल्यानं आगीच्या घटना घडत असतात.

हे सुद्धा वाचा

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.