वाघांची संख्या वाढली, मानवी मृ्त्यूचे काय?; चंद्रपुरात दर महिन्यात जातात इतके बळी

वाघाला पाहण्यासाठी जंगलात गर्दी केली जाते. हाच वाघ गावात येतो तेव्हा आक्रोश निर्माण होतो. शिवारात वाघ आल्यास लाठ्या-काठ्यांनी त्याचे स्वागत होते.

वाघांची संख्या वाढली, मानवी मृ्त्यूचे काय?; चंद्रपुरात दर महिन्यात जातात इतके बळी
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 1:37 PM

चंद्रपूर : देशातील व्याघ्र संवर्धनाचा परिणाम म्हणजे नुकतीच वाघांची जाहीर झालेली आकडेवारी. देशात वाघांची संख्या समाधानकारकरीत्या वाढली असताना चंद्रपूर सारख्या जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षात गेल्या वर्षभरात 50 हून अधिक ग्रामस्थांचे मृत्यू झाले आहेत. एखाद्या व्याघ्र प्रकल्पापेक्षा अधिक वाघ ब्रह्मपुरी तालुक्यातील प्रादेशिक जंगलात आढळले आहेत. याशिवाय गेल्या काही वर्षात कोळसा खाणी, औद्योगिक क्षेत्रे ,आयुध निर्माणी यासारख्या औद्योगिक आणि मुख्यत्वे शहरी भागातही वाघांचे नवे अधिवास निर्माण झाले आहेत.

वाघांबाबत नकारात्मक भावना

यातून गेली काही वर्षे वनव्याप्त क्षेत्रातील गावात कोरोनासारखा टायगर लॉकडाऊन बघायला मिळत आहे. यामुळे वाघांविरोधात नकारात्मक भावना निर्माण होत आहे. ज्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात हजारो रुपये खर्च करून पर्यटक व्याघ्र सफारीसाठी येतात, त्याच वाघाचे ग्रामीण भागात लाठ्याकाठ्यांनी व प्रसंगी विषप्रयोगासारखी वागणूक दिली जाते.

हे सुद्धा वाचा

चंद्रपुरात दर महिन्याला वाघाचे बळी

अशा स्थितीत वाघांची वाढती संख्या, त्यांच्यासाठीचे घटते जंगल, अतिक्रमण झालेले भ्रमण मार्ग याविषयी वनविभाग व प्रशासकीय पातळीवर व्यापक प्रयत्नांची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात दर महिन्याला तीन-चार वाघाचे बळी जातात. त्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होतो.

हे चित्र बदलण्याची गरज

ईको प्रो वन्यजीव संघटनेचे अध्यक्ष बंडू धोतरे म्हणाले, वाघाला पाहण्यासाठी जंगलात गर्दी केली जाते. हाच वाघ गावात येतो तेव्हा आक्रोश निर्माण होतो. शिवारात वाघ आल्यास लाठ्या-काठ्यांनी त्याचे स्वागत होते.हे निर्माण झालेलं चित्र बदलण्याची गरज आहे.

समस्या सरकारी पातळीवर सोडवावी

कोरोनासदृश्य परिस्थिती गेल्या कित्येक दिवसांपासून वाघ्र प्रकल्पाजवळील गावांमध्ये आहे. संबंधित गावकरी, शेतकरी यांचे अनेक प्रश्न आहेत. वाघ-मानव संघर्षात नकारात्मक भावना वाघाच्या बदद्ल निर्माण झाली आहे. ही समस्या सरकारी पातळीवर सोडवली गेली पाहिजे.

वाघांचे स्थलांतर एका जंगलातून दुसऱ्या जंगलात होणे थांबले आहे. भ्रमणमार्गात विकासकामं झालीत. त्यामुळे वाघांनी अंडरपास किंवा ओव्हरपास मार्ग हवा आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वाघांची संख्या वाढत असताना संघर्ष निर्माण झाला आहे.

'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.