Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“राष्ट्रवादीत ओबीसी फक्त चेहरे दाखवण्यासाठी, त्यांना पदं देत नाहीत”; ओबीसीच्या मुद्यावरून फडणवीसांनी राष्ट्रवादीला छेडले

आमचा वसाहती सारखा उपयोग करू नका, ज्या भागात लोह संपदा मिळत आहे त्याचा भागातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, त्याच ठिकाणी त्यावर प्रक्रिया झाली पाहिजे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

राष्ट्रवादीत ओबीसी फक्त चेहरे दाखवण्यासाठी, त्यांना पदं देत नाहीत; ओबीसीच्या मुद्यावरून फडणवीसांनी राष्ट्रवादीला छेडले
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 8:42 PM

चंद्रपूर : राज्यातील राजकारण वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच चर्चेत राहिले आहे. कधी महापुरुषांचा अपमान तर कधी आक्षेपार्ह विधानावरुनही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. राज्यात ओबीसी आरक्षणावरून गेल्या कित्येक दिवसांपासून राजकारण तापले आहे. ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले असले तरी आता उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार आल्यानंतरच ओबीसींना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. तर यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

ओबीसी आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. टीका करताना ते म्हणाले की, राष्ट्रवादीत ओबीसी फक्त चेहरे दाखवण्यासाठी आहे मात्र ज्यावेळी त्यांना कोणतेही पद देण्याची वेळ येते त्यावेळी मात्र ते ओबीसींना पदं देत नाहीत असा गंभीर आरोपही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केला आहे.

भाजप तुमच्या पाठीशी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक जिवतोडे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला त्यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. यावेळी जिवतोडे यांना सांगितले की, तुम्ही राष्ट्रवादीतून आला असला तरी आता भाजप तुमच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी दिला आहे.

सरकार वेगवान

यावेळी त्यांनी विकासाच्या मुद्यावरही भाजप हे महाविकास आघाडीपेक्षा हे सरकार किती वेगवान आहे हेही त्यांनी यावेळी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सांगताना त्यांनी भाजपमुळे विकास किती गतिमान झाला आहे हेही त्यांनी यावेळी सांगितले. समृद्धी महामार्ग गोंदिया, गडचीरोली ला जाणार आहे.मात्र आता तुमची इच्छा असेल तर चंद्रपूरमध्ये पण समृद्धी महामार्ग नेण्याचा विचार होईल असे अश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

अमेरिकेत  भारताचा सन्मान

सामान्य ओबीसी समाजाचा चेहरा आज जगात देशाचा सन्मान वाढवत आहे, त्यामुळे यापेक्षा ओबीसीचा सन्मान काय असेल अशा शब्दात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव केला आहे. अमेरिकेत आज भारताचा सन्मान होत आहे, हा मोदींचा सन्मान तर आहेच पण देशाचाही सन्मान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. देशाच्या मंत्रिमंडळात आज जेवढे ओबीसी मंत्री आहेत त्यापूर्वी कुठल्याही सरकारमध्ये असे मंत्री नव्हते असा टोलाही त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लगावला आहे.

फक्त ओबीसी चेहरे

तसेच यावेळी त्यांनी सांगितले की, आजपर्यंत जेवढे ओबीसींसाठीचे जे निर्णय झाले ते एकतर मोदींनी काढले नाहीतर मी काढले आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे ओबीसीला मुख्य धारेत आणण्याचे कामही भाजप करत आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फक्त ओबीसी चेहरे हवे आहेच, मात्र पदं मिळत नाहीत असं म्हणत त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे.

‘त्याचा’ भागातील तरुणांना रोजगार

2014 ते 2019 या विदर्भाला जो निधी मिळाला तो काँग्रेस राष्ट्रवादीच्या 15 वर्षाच्या काळातील एकत्रित केला तरी मिळाला नाही हा माझा दावा असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमचा वसाहती सारखा उपयोग करू नका, ज्या भागात लोह संपदा मिळत आहे त्याचा भागातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, त्याच ठिकाणी त्यावर प्रक्रिया झाली पाहिजे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका.
रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू
रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू.
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले.
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले.
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी.
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या.
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला.
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर.