ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ही कुतुहलाची घटना आली समोर; या रंगाचे 2 बिबट पिल्लू दिसले उड्या मारताना

हे दोन्ही पिल्लू बिनधास्त रस्ता क्रास करतात. त्यानंतर जंगलात पळून जातात. जंगलात जाताना ते उड्या मारताना दिसून येतात.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ही कुतुहलाची घटना आली समोर; या रंगाचे 2 बिबट पिल्लू दिसले उड्या मारताना
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 11:47 AM

चंद्रपूर : निसर्ग संपन्न व वन्यजीव श्रीमंती असलेल्या चंद्रपूरच्या ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पात दोन काळ्या बिबट बछड्यांचे दर्शन झाल्याने आनंद व्यक्त होत आहे. चिमूर तालुक्यातील मदनापूर गेट परिसरात आपल्या नियमित कर्तव्यावर असलेल्या वनाधिकारी आर. ओ. गेडाम यांनी आपल्या कॅमेऱ्यात हा व्हिडीओ कैद केला आहे. या भागात स्वच्छंदपणे रस्ता ओलांडत असलेल्या मादी बिबट व काळ्या दोन बछड्यांचे दर्शन झाल्याने वनाधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. आतापर्यंत ताडोबामध्ये एकच काळा बिबट आढळला होता. मात्र ही काळी बछडी त्याचीच पिलं असल्याचा शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या काळ्या बिबट बछड्यांची आई मात्र सामान्य मादी बिबट आहे. आता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात काळ्या बिबट्यांच्या संख्येत वाढ होईल का, असाही प्रश्न निर्माण होत आहे.

bibat 2 n

चार वर्षांपूर्वी दिसला काळा बिबट

सध्या तरी या नव्या खुलाशाने वन्यजीव अभ्यासक व तज्ञांना अभ्यासाचे नवे दालन खुले झाले आहे. काही पर्यटकांना मदनापूर गेटजवळ रविवारी सकाळी हे काळे बिबट पाहायला मिळाले. पर्यटकांनी बिबट आणि काळ्या रंगाच्या दोन पिल्लांचा व्हिडीओ व्हायरल केलाय. गेल्या चार वर्षांपूर्वी या जंगलात काळा बिबट दिसला होता. हा काळ्या रंगाचा बिबट कोळसा गेटवजवळ दिसत होता. मादी बिबटसोबत समागम झाल्याने त्यांच्यापासून हे काळे बिबटे जन्माला आहे असावेत. हे पिल्लू नर आहेत की मादी हे कळू शकले नाही. या काळ्या रंगांच्या बिबट्यांमुळे पर्यटक ताडोबात आकर्षित होऊ शकतात.

हे सुद्धा वाचा

व्हिडोओत नेमकं काय?

जंगलात काळ्या बिबटाचे दोन पिल्लू दिसत आहेत. समोरचा पिल्लू रस्ता क्रास करताना दिसत आहे. त्याच्यापाठोपाठ दुसराही बिबटाचा पिल्लू रस्त्या क्रास करण्यासाठी येतो. एक अतिशय काळा आहे. तर दुसरा पुसट काळा आहे. हे दोन्ही पिल्लू बिनधास्त रस्ता क्रास करतात. त्यानंतर जंगलात पळून जातात. जंगलात जाताना ते उड्या मारताना दिसून येतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या काळा रंगाच्या बिबट्याची चर्चा आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.