जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आता गाईड्ससाठी ग्रेडेशन सिस्टिम, प्रत्येक ट्रीपनंतर निश्चित मानधन मिळणार
देश-विदेशातील पर्यटकांचा अतिशय आवडीचा व्याघ्र प्रकल्प म्हणजे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प. पट्टेदार वाघाच्या दर्शनासाठी या प्रकल्पात लाखो पर्यटक दाखल होत असतात.
चंद्रपूर : चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता पर्यटक गाईड्स साठी ‘ग्रेडेशन अर्थात स्टार सिस्टम’ लागू कऱण्यात आली आहे. या मध्ये 3 स्टार, 2 स्टार आणि 1 स्टार अशी विभागणी असणार आहे. विशेष म्हणजे या स्टार सिस्टमनुसारच ताडोबातील गाईड्सला मिळणारे मानधन निश्चित करण्यात आले आहे. सध्या या निर्णयावर वेगवेगळे सूर उमटत आहेत.
प्रत्येक ट्रिपमागे मानधन निश्चित
देश-विदेशातील पर्यटकांचा अतिशय आवडीचा व्याघ्र प्रकल्प म्हणजे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प. पट्टेदार वाघाच्या दर्शनासाठी या प्रकल्पात लाखो पर्यटक दाखल होत असतात. याच ताडोबात पर्यटकांना टायगर सफारी घडवणाऱ्या गाईड्ससाठी आता नवीन ग्रेडेशन अथवा स्टार सिस्टम लागू कऱण्यात आली आहे. यासाठी एप्रिल महिन्यात एक विशेष परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेच्या आधारावर ही ‘स्टार सिस्टम’ निर्धारित करण्यात आली आहे. ग्रेडेशननुसार 3 स्टार मिळालेल्या गाईड्सला 500, 2 स्टार असलेल्या गाईड्सला 450 आणि 1 स्टार असलेल्या गाईड्ससाठी 400 रुपये प्रत्येक ट्रिपमागे मानधन निश्चित करण्यात आले आहे.
निर्णयावर वेगवेगळे सूर
एखाद्या गाईडला ताडोबा व्याघ्र प्रकल्पाबद्दल, तिथल्या प्राण्यांबद्दल आणि जैवविविधतेबद्दल किती माहिती आहे? त्यांना इंग्रजी बोलता येतं का? त्यांचं communication skill कसं आहे ? तसेच त्यांचा पर्यटकांसोबत व्यवहार आणि सवयी कशा आहेत? यावर गुण देऊन ही वर्गवारी निश्चित झाली. विशेष म्हणजे ग्रेडेशनमुळे गाईड्सच्या मानधनात वाढ होणार आहे. यामुळे आपल्या वर्गवारीत सुधारणा व्हावी यासाठी त्यांच्यात एक स्पर्धात्मक भावना देखील तयार झाली आहे. दुसरीकडे काहींनी मात्र सर्वांनासारखेच मानधन मिळावे अशी भावनाही व्यक्त केली.
ताडोबाच्या बफर क्षेत्रात या नवीन ग्रेडेशन पध्दतीचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे ताडोबाच्या कोअर क्षेत्रामध्ये देखील ही पद्धत पावसाळ्यानंतर ऑक्टोबरमध्ये सुरु होणार आहे. या नवीन हंगामापासून लागू करण्याचा व्याघ्रप्रकल्प प्रशासनाचा प्रयत्न आहे.
वस्तीवरच्या मुलांसाठी तो बनला ‘गुरूजी’, 14 वर्षीय ओमकारकडून चिमुरड्यांना ज्ञानार्जनhttps://t.co/QRfJMWcmnO#Maharashtra #beed #School #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 28, 2021
(Chandrapur Tadoba Tiger Reserve has now implemented gradation star system for tourist guides)
संबंधित बातम्या :
कोणत्याही गोष्टीवर उडपटांग बोलणं म्हणजे अभ्यास नाही; राऊतांचा फडणवीसांना टोला