Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur Leopard : चंद्रपुरात थंड हवेसाठी अंगणात झोपला; बिबट्याने 70 वर्षीय व्यक्तीस उचलून नेले

उर्मी होते म्हणून ग्रामीण भागात काही लोकं अंगणात झोपतात. चंद्रपुरात अंगणात झोपलेल्या ज्येष्ठ व्यक्तीला बिबट्याने रात्री उचलून नेले. त्यामुळं सरडपार चक गाव परिसरात बिबट्याची दहशत पुन्हा निर्माण झाली आहे.

Chandrapur Leopard : चंद्रपुरात थंड हवेसाठी अंगणात झोपला; बिबट्याने 70 वर्षीय व्यक्तीस उचलून नेले
बिबट्याने वृद्धावर हल्ला केल्याची घटना सिंदेवाही तालुक्यात घडली.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 3:06 PM

चंद्रपूर : गर्मीमुळे त्रस्त झालेले ग्रामीण भागातील लोक बाहेर अंगणात झोपतात. असेच झोपणे माणिक बुद्धा नन्नावरे (Manik Buddha Nannavare) यांच्या जीवावर बेतले. रात्री अंगणात झोपलेले असताना बिबट्याने हल्ला (Bibatyacha Halla) करीत जागीच ठार केले. ही घटना जिल्ह्यातील सरडपार चक (Sardpar Chak) येथे घडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली. जंगलातील वन्यप्राणी गावात येऊन शिकार करीत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढलेला आहे. अंगाची लाही लाही सुरू आहे. ग्रामीण भागात नैसर्गिक थंड हवेसाठी गावकरी अंगणात झोपी जातात.

झोपले असताना हल्ला

सिंदेवाही तालुक्यातील सरडपार चक येथील 70 वर्षीय माणिक बुध्दा नन्नावरे हे अंगणात झोपले होते. त्याच दरम्यान बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात नन्नावरे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पंचनामा सुरू आहे. उर्मी होते म्हणून ग्रामीण भागात काही लोकं अंगणात झोपतात. चंद्रपुरात अंगणात झोपलेल्या ज्येष्ठ व्यक्तीला बिबट्याने रात्री उचलून नेले. त्यामुळं सरडपार चक गाव परिसरात बिबट्याची दहशत पुन्हा निर्माण झाली आहे.

वनविभागाचे अधिकारी म्हणतात काळजी घ्या

चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर येथे दोघांना बिबट्याने उचललं होतं. या घटनेचा अद्याप विसर झालेला नसताना सिंदेवाही तालुक्यात घडलेल्या घटनेमुळे गावकरी धास्तावले आहेत. वन्यप्राण्यांची भीती निर्माण झाली आहे. आता आम्ही घरीही अंगणात झोपायचे नाही काय, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत. वनविभागाचे अधिकारी यावर काही बोलायला तयार नाहीत. नागरिकांनी काळजी घ्यावी, एवढच त्यांचं म्हणण आहे.

Curfew in Achalpur | अचलपुरात संचारबंदीचा दुसरा दिवस, शाळा-महाविद्यालयाच्या परीक्षा पुढं ढकलल्या; गावात तणावपूर्ण शांतता

Nitin Raut on Population | यंदाचं वर्ष लोकसंख्या नियंत्रण वर्ष म्हणून घोषित करा, डॉ. नितीन राऊत असं का म्हणालेत?

Chandrapur Temperature | चंद्रपुरात वीज वितरण यंत्रांनाच कुलर्स, का घेतली जातेय विशेष खबरदारी?

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.