सांगलीच्या जतमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून तणाव, जमावबंदी आदेश लागू करत पोलिसांचं संचलन

सांगलीच्या जत (Jat) शहरातील छत्रपती शिवाजी चौकामध्ये चबुतरा बसवून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chh. Shivaji Maharaj Statue) बसण्यावरून तणाव निर्माण झाला आहे.

सांगलीच्या जतमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून तणाव, जमावबंदी आदेश लागू करत पोलिसांचं संचलन
जतमध्ये पोलिसांचं संचलन
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 11:37 AM

सांगली: सांगलीच्या जत (Jat) शहरातील छत्रपती शिवाजी चौकामध्ये चबुतरा बसवून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chh. Shivaji Maharaj Statue) बसण्यावरून तणाव निर्माण झाला आहे. लोकवर्गणीतून 16 लाखाहून अधिक रुपये खर्चून तयार केलेला छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा बसण्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी पुतळा बसविण्यासाठी आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय हा पुतळा चबुतऱ्यावर उभा करता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. पुतळा समितीने जुन्या ठिकाणीच पुतळा बसविण्यात येणार असून जीर्णोद्धार करत असल्याने परवानगीची आवश्यकता नाही, असा दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर जत शहरात पोलिसांनी मोठा पोलीस (Sangli Police ) बंदोबस्त तैनात केला असून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. तर, काल सायंकाळी पोलिसांनी शहरातून संचलन सुद्धा केले आहे. संभाजी भिडे यांनी सुद्धा जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शन घेतले आहे.

Sangli Jat Shivaji Maharaj Statue

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा

जगताप सावंत यांच्यात वादाची ठिणगी

याच मुद्द्यावरून पुतळा समितीचे अध्यक्ष माजी आमदार विलासराव जगताप व आमदार विक्रम सावंत यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यात वातावरण चिघळण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात केला आहे. जत-सांगली रस्त्यावरील छत्रपती शिवाजी चौकात 1962 साली तत्कालीन जत संस्थानिक डफळे यांनी छत्रपतींचा पुतळा बसविला होता. परंतु, सोळा वर्षापुर्वी एका वाहनाच्या धडकेत चबुतरास तडा गेल्याने हा पुतळा काढण्यात आला होता. त्यानंतर या ठिकाणी लोकवर्गणीतून नवा अश्वारूढ पुतळा बसविणे व जीर्णोद्धार करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेते व शिवप्रेमीने घेतला होता. हा पुतळा तयार झाल्याने तो यावर्षीच्या शिवजयंतीला (19 फेब्रुवारी) बसवण्यात यावा अशी लोकभावना आहे. त्यानुसार समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा मिरजेतून शनिवारी पोलिसांनी अटकाव करूनही जत शहरात आणला आहे.

Sambhaji Bhide at Jat

संभाजी भिडे

सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संबंधित विभागाची परवानगी घेतल्याशिवाय पुतळा बसवता येणार नाही. असा आदेश दिला आहे. त्यानंतर पुन्हा वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांपासून शहरात वातावरण तंग बनले आहे. छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये. म्हणून शहरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहराला छावणीचे स्वरूप आले आहेत. तसेच राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात केले आहेत शिवाजी चौक, बस स्थानक परिसर, बाजारपेठ प्रमुख रस्ते, जगताप पेट्रोल पंप आदी प्रमुख ठिकाणी मोठा बंदोबस्त आहे. आणि शहरात जमावबंदी आदेश लागू केला आहे.

इतर बातम्या:

आंतरराष्ट्रीय तिरंदाज खेळाडू काय करतो माहीत आहे का?, वाचा नागपुरातील दिव्यांग खेळाडूचा जीवन संघर्ष

Video : जिंदगी एक सफ़र है सुहाना…! तुम्ही कधी माकडाला सायकल चालवताना पाहिले आहे का? पाहा व्हायरल व्हिडिओ…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.