साताऱ्यात केंजळगडावर चढाई करताना 10 वर्षाच्या मुलाचा पाय सटकला, दरीत कोसळल्यानं मोठी दुर्घटना
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात केंजळगडावरही अशीच एक घटना घडलीय. केंजळगडाची चढाई करत असताना एक 10 वर्षांचा मुलगा दरीत कोसळून गंभीर जखमी झाला.
सातारा : पावसाळ्याचे दिवस म्हटलं की सगळीकडेच पर्यटनाची रेलचेल सुरू होते. मात्र, अशातच काही दुर्घटनाही घडल्याचं समोर येतं. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात केंजळगडावरही अशीच एक घटना घडलीय. केंजळगडाची चढाई करत असताना एक 10 वर्षांचा मुलगा दरीत कोसळून गंभीर जखमी झाला. मयंक उरणे असं या बालकाचं नाव आहे. पाखेरी वस्तीतील युवक आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्याला दरीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे. या मुलाला वाई येथील प्राथमिक उपचारानंतर पुणे येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे (10 year old child fall in Valley of Kenjalgad Satara).
पुणे जिल्ह्यातील सासवड परिसरात रहिवासी असलेले 7 ते 8 पर्यटक वाई जवळच्या केंजळगडावर पर्वतारोहण करण्यासाठी आले होते. यामध्ये मयांक उरणे हा आपल्या वडीलांसोबत आला होता. केंजळगडावर सकाळी 7 वाजता सर्वांनी पर्वतरोहणाला सुरुवात केली. सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान पुढे जात असताना मयांक उरणे या 10 वर्षाचा मुलगा 200 फूट खोल दरीत कोसळला. यात हा मुलगा गंभीर जखमी झाला.
सकाळपासून पावसाची रिप रिप वाढलेले आणि वाढलेले गवत यामुळे किल्ल्याच्या पाऊल वाटेवर चिपचीप झालीय. त्यामुळे मयंकचा पाय घसरून तो दरीत कोसळला. मात्र, खाल पडत असताना दरीमधील झाडाला अडकल्याने त्याचा जीव वाचला. सुरुवातीला त्याचा शोध घेऊनही तो सापडत नव्हता. त्यामुळे संबंधित पर्यटकांनी याबाबत आसरे ते रायरेश्वर रस्त्यावर असणाऱ्या पाखिरे वस्तीतील नागरिकांना माहिती दिली. अखेर स्थानिकांच्या मदतीने मयंक उरणे या मुलाला गंभीर जखमी अवस्थेत दरीतून काढण्यात यश आलं. वाई येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी मयंक उरणे यास पुण्याला नेण्यात आलं.
हेही वाचा :
PHOTO | तुफान पाऊस, फेसाळलेले पाणी, साताऱ्यातील ठोसेघर धबधब्याचे विलोभनीय फोटो
VIDEO : साताऱ्याच्या मांडवे गावात ढगफुटी सदृश्य पाऊस, पुरात वाहून एका महिलेचा मृत्यू
Photo : साताऱ्यातील पाटणमध्ये फुललं एलिफन्ट वाम, या दुर्मिळ वनस्पतीचा आकार आहे गणेशमूर्ती सारखा
व्हिडीओ पाहा :
10 year old child fall in Valley of Kenjalgad Satara