Chipi Airport: चाकरमान्यांसाठी गोड बातमी! येत्या 7 ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरून विमानांचं टेकऑफ!

कोकणातील चाकरमान्यांसाठी गोड बातमी आहे. येत्या 7 ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरून विमानांचं उड्डाण सुरू होणार आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी तशी माहिती दिली. (chipi airport will start from 7th october said vinayak raut)

Chipi Airport: चाकरमान्यांसाठी गोड बातमी!  येत्या 7 ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरून विमानांचं टेकऑफ!
Sindhudurg Chipi airport
Follow us
| Updated on: Sep 05, 2021 | 3:15 PM

सिंधुदूर्ग: कोकणातील चाकरमान्यांसाठी गोड बातमी आहे. येत्या 7 ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरून विमानांचं उड्डाण सुरू होणार आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी तशी माहिती दिली. तसेच या कामाचं श्रेय कोकणातील जनतेलाच असल्याचंही विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं. (chipi airport will start from 7th october said vinayak raut)

चिपी विमानतळ सुरू करण्यास अखेर डीजीसीआयची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग ते मुंबई हा प्रवास अवघ्या 2500 रुपयात होणार आहे. कार्यवाही वेळेत पूर्ण होऊ शकली नाही म्हणूनच मी पुन्हा एकदा दिल्लीला गेलो होतो. आम्ही हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटलो. त्यांना चिपी विमानतळाचे काम पूर्णपणे झालेले आहे. लायसन्स मिळालेलं आहे असं सांगितल्याचं विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं.

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उड्डाण

7 ऑक्टोबर हा नवरात्रोत्सोवाचा पहिला दिवस आहे. त्या दिवशीपासून आम्ही हवाई वाहतूक सुरू करायला सज्ज आहोत, अशा पद्धतीचं लेखी पत्र कंपनीची विमान वाहतूक करणाऱ्या विभागाने दिलं आहे. त्यामुळे आता विमानतळ शंभर टक्के सुरू करायला हरकत नाही. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर विमानतळ सुरू करण्याचं ठरलं होतं. पण नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस आहे. त्या दिवसापासून विमान प्रवास सुरू होणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

राणेंवर टीका

यावेळी त्यांनी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावरही टीका केली. राणेंनी चिपी विमानतळासाठी 14 वर्ष काहीच केलं नाही, अशी टीका त्यांनी केली.

राज यांना टोला

महापालिकांवर प्रशासक नेमण्यासाठीच निवडणुका पुढे ढकलण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्यालाही राऊत यांनी उत्तर दिलं. शरद पवारांनी 1985मध्ये महापालिकेवर दोन वर्षासाठी प्रशासक नेमला होता हे राज ठाकरे यांना माहीत नाही, असं सांगतानाच ओबीसी आरक्षणामुळे पालिका निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे, असंही ते म्हणाले. (chipi airport will start from 7th october said vinayak raut)

संबंधित बातम्या:

Chipi Airport | चिपी विमानतळाची वाहतूक ‘या’ तारखेपासून सुरु होणार

चिपी विमानतळाचं उद्घाटन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर येणार

चिपी विमानतळाचं उद्धाटनाचा मुहूर्त पुढे ढकलला, कारण काय?

(chipi airport will start from 7th october said vinayak raut)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.