Chandrapur | चितळ शिकार प्रकरण; फरार आरोपीला अडीच वर्षानंतर ठोकल्या बेड्या
चितळ शिकार प्रकरणी आरोपी फरार झाले होते. एका आरोपीला अटक करण्यात आली होती. दुसरी दोन आरोपी निसटले होते. त्यांना तब्बल अडीच वर्षानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले.
चंद्रपूर : चितळ शिकार प्रकरणातील (Hunting Case) फरारी आरोपी अडीच वर्षानंतर सापडले. विरुर (स्टे) राजुरा वनपरिक्षेत्रांतर्गत (Rajura Forest Range) सिंधी गावात चितळाची शिकार करण्यात आली होती. त्यानंतर दोन आरोपी फरार झाले होते. त्या फरार झालेल्या दोन आरोपींना राजुरा वनविभागाच्या कर्मचाऱ्याने अटक केली. ते सिंधी गावात त्यांच्या घरीच सापडले. साईनाथ बापूजी कोडापे ( वय 39) व संजय मारोती कोडापे (वय 42 वर्षे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ही कामगिरी राजुरा वनपरिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. चितळ शिकारीच्या प्रकरणातील अडीच वर्षापासून फरार असलेले आरोपींना पकडण्यास वन विभागास यश (Forest Department to catch the accused) आलं.
अशी घडली घटना
23 ऑगस्ट 2019 रोजी सिंधी गावात वन्यप्राणी चितळाचे मासाचे विल्हेवाट लावत होते. याची माहिती मिळाल्यावरून बापूजी कोडापे या आरोपीला अटक करण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला होता. पण, यामध्ये सहभागी असलेले मोक्यावरून फरार झाले. या वनगुन्ह्यातील आरोपी साईनाथ बाजूजी कोडापे व संजय मारोती कोडापे यांना 21 मार्च रोजी पहाटेच्या वेळी अटक करण्यात आली. सिंधी गावात धाड टाकून त्यांचे राहते घरून ताब्यात घेण्यात आले.
यांनी केली कारवाई
सदर कारवाई उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांचे मार्गदर्शनात उपविभागीय वनाधिकारी अमोल गर्कल, वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांच्या नेतृत्वात क्षेत्र सहायक एन. के. देशकर, क्षेत्र सहायक पी. आर. मत्ते, ईश्वर रूद्रशेटटी, वनरक्षक सुलभा उरकुडे, सुनील मेश्राम, संजय सुरवसे यांनी केली.