कायदे आणि नियम फक्त भाजपलाच का? नारायण राणेंच्या अटकेवरुन चित्रा वाघ आक्रमक

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी नारायण राणेंच्या अटकेनंतर राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. त्या अहमदनगरला माध्यमांशी बोलत होत्या.

कायदे आणि नियम फक्त भाजपलाच का? नारायण राणेंच्या अटकेवरुन चित्रा वाघ आक्रमक
Chitra-Wagh
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 7:03 PM

अहमदनगर: भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी नारायण राणेंच्या अटकेनंतर राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. त्या अहमदनगरला माध्यमांशी बोलत होत्या. अटक करण्याची आणि गुन्हे दाखल करण्याची तत्परता ही फक्त भाजप नेत्यांसाठी आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.

पुणे, औरंगाबाद आणि पारनेरच्या घटनेवेळी तात्पर्य कुठे गेली?

नारायण राणे यांच्या अटकेसाठी जी तत्परता दाखवली ती तत्परता कुठे गेली आहे, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. पुणे, औरंगाबाद आणि पारनेर मध्ये का नाही दाखवली असा सवाल चित्रा वाघ यांनी केलाय. इतकेच नाही तर कायदे आणि नियम फक्त भाजपसाठी आहे, सत्ताधाऱ्यांना लागू होत नाही का असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

हीच तुमची शिवशाही आहे का?

नारायण राणे यांच्या अटेकसाठी तत्परता दाखवणं आणि इतर प्रकरणी तत्परता न दाखवणं हीच तुमची शिवशाही आहे का? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. सरकार हमसे डरती है आणि पुलिस को आगे करती है, अशी टीका देखील चित्रा वाघ यांनी केला आहे.

शर्जिल उस्मानी मोकाट

नारायण राणे महाराष्ट्र सरकारनं अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक आठवण करुन देत आहे, की तमाम हिंदू समाजा विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा शर्जिल उस्मानी अजून मोकाट हुंदडतोय, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

शिवसेनेने तमाशा बंद करावा, अन्यथा भाजप राज्यभरात तांडव करेल : आशिष शेलार

शिवसेनेने हा तमाशा बंद करावा, भाजपच्या कार्यालयाजवळ जे तमाशे चालू झाले तर भाजप महाराष्ट्रभर तांडव करेल, त्याची सर्व जबाबदारी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीची राहील. त्यानंतर मंत्री अनिल परब यांची क्लिपही व्हायरल झाली आहे. तालिबानींपेक्षाही भयंकर असं हे दिसतंय. मुळात राणे साहेबांनी स्वत: सांगितलं गुन्हा केला नाही, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. तुम्ही क्लिप दाखवताय, आमच्याकडे सीडी आहेत. सगळ्या सीडी मविआ नेत्यांच्या आहेत. एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेत ना, ते एकमेकांवर गुन्हे दाखल करतील.

नारायण राणेंच्या अटकेविरोधात केंद्रीय भाजपही आक्रमक झालं आहे, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. माजी मंत्री विनोद तावडे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले आहेत. नारायण राणेंच्या अटकेविरोधात भाजपचे नेते राजभवनावर दाखल झाले आहेत. नारायण राणे यांच्या अटकेसंदर्भातील घडामोडी राज्यपालांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे.

इतर बातम्या:

‘शिवसेनेच्या नेत्यांनीही यापूर्वी अशी वक्तव्य केली, त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल केले?’ रामदास आठवलेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

इंपिरिकल डाटा संदर्भात केंद्र सरकारने तीन आठवड्यांचा वेळ मागितला, छगन भुजबळांची माहिती

Chitra Wagh slams Maharashtra MVA Government over arrest of Narayan Rane

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.