एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी फिर तो मैं… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुफान डायलॉगबाजी; नेमकं काय घडलं?

मला शेतकऱ्यांविषयी फार प्रेम आणि जिव्हाळा आहे. त्यांचं देखील जीवनमान बदललं पाहिजे. त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आले पाहिजे. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी हे सरकार आहे.

एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी फिर तो मैं... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुफान डायलॉगबाजी; नेमकं काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 09, 2023 | 7:35 AM

जळगाव: मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून एकनाथ शिंदे यांची तुफान फटकेबाजी सुरू आहे. विरोधकांवर टीका करण्याची एकही संधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोडत नाहीत. किस्से आणि सिनेमाचे डायलॉग ऐकवून ते विरोधकांना चीतपट करत आहेत. जळगाव दौऱ्यावर असतानाही त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी फिर तो मैं अपने आप की भी नहीं सुनता, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्ला चढवलाच शिवाय आपली कार्यपद्धती कशी आहे हे सुद्धा जळगावकरांना सांगून टाकलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल जळगावच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली. सीएम म्हणजे लोक म्हणतात चीफ मिनिस्टर. परंतु मी म्हणतो कॉमन मॅन. सर्वसामान्य माणूस, असा सीएम शब्दाचा अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उलगडवून सांगितला.

हे सुद्धा वाचा

गिरीशभाऊ आपला खेळाडू माणूस आहे, सर्व खेळ खेळणारा माणूस आहे.परदेशात खेळाडूंना विमानाने पाठवणारा हा पहिला मंत्री आहे, असं सांगतानाच बडगुजर समाज छोटा आहे मात्र माणसे मोठी आहेत. बडगुजर समाज छोटा असला तरी तुमची एकजूट महत्त्वाची आहे. आपण सर्व बडगुजर एकत्र केले तर गुजरांची किती मोठी ताकद होईल याचा विचार करा, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मला शेतकऱ्यांविषयी फार प्रेम आणि जिव्हाळा आहे. त्यांचं देखील जीवनमान बदललं पाहिजे. त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आले पाहिजे. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी हे सरकार आहे. अल्पावधीत हे सरकार लोकप्रिय होत आहे.

30 हजार पाणीपुरवठा योजना मंजूर करणे हा देखील रेकॉर्ड आहे. शहरी भागासह ग्रामीण भागाला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. धाडसाने आम्ही निर्णय घेतले. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्याचे निर्णय कोणी घेत नव्हतं, आम्ही केले, असं ते म्हणाले.

आम्ही नेहमी जमिनीवर राहून काम करणारे कार्यकर्ते आहोत. सत्तेची हवा कधीच आमच्या डोक्यात जाणार नाही. सरकार तुमच्या पाठीशी आहे एवढा विश्वास बाळगा. आचारसंहिता असल्याने मी एवढेच सांगतो, वस्तीगृहाचा विषय एवढा मोठा नाहीये. समझनेवाले को इशारा काफी है, असं सूचक विधान त्यांनी केलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.