चंद्रपूर : नाशिकच्या काळाराम मंदिरातील वेदोक्त मंत्र प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी चंद्रपुरात (Chandrapur) खडेबोल सुनावले आहेत. बहुजन समता पर्व कार्यक्रमात बोलताना अंधारे यांनी ही घटना संयोगीताराजे अर्थात राजघराण्यातील व्यक्तीसंदर्भात घडल्याने लगेच ब्राम्हणमुक्त मंदिराची हाक महाराष्ट्रभर देण्यात आली. मात्र एखाद्या दलिताच्या मंदिर प्रवेश मुद्द्यावर मौन सोयीने मौन बाळगतात. ब्राह्मणमुक्तीची हाळी देणारे लोक सिलेक्टिव्ह राजकारण करत असल्याचा घणाघात त्यांनी केला.
चंद्रपूरच्या बहुजन समता पर्व कार्यक्रमात सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. घटनेत व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य असताना रॅपर्स आणि विचारवंतांवर कारवाई होत असल्याचे मत त्यांनी मांडले. फुले-शाहू आंबेडकर यांचे साहित्य रस्त्यावर जाळून दाखविण्याचे आव्हान त्यांनी फडणवीसांना दिले. ते धाडस नसल्याने त्यांचे विचार संपविले जात असल्याचे विधान त्यांनी केले.
ईडी, सीबीआयपासून वाचण्यासाठी गद्दारी झाली, यावर शिक्कामोर्तब झालंय, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गौप्यस्फोट केला. शिंदे त्यावेली मातोश्रीवर येऊन रडले होते, असं आदित्य ठाकरे म्हणाले. त्यावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे म्हणाल्या, बंडात हिंदुत्वाचा मुद्दा कधीच नव्हता. हे उघड झालंय.
ज्या ज्या लोकांच्या ईडी आणि सीबीआयच्या फाईल होत्या. त्या फाईल्स उघडल्या जाण्याची भीती होती. त्यामुळे त्यांना भीती वाटत होती. भाजपची ही मोडस ऑपरंडसी आहे. आमच्यासोबत आलात तर आम्ही तुम्हाला वॉशिंग मशिनमधून धुऊन काढू आणि दोषमुक्त करू.
पण, तुम्ही जर आमच्यासोबत आला नाहीत तर जेलमध्ये. एकतर भाजपात या नाहीतरी जेलमध्ये जा. या भूमिका भाजपच्या कित्तेक उदारहणं देऊन स्पष्ट करता येतील. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी जी भूमिका मांडली. त्यात काही वावगं आहे, असं मला वाटत नाही, असंही सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं.
एकनाथ शिंदे यांनी जेलमध्ये जाण्याच्या भीतीने बंड पुकारत भाजपसोबत सत्ता स्थापन केली, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला. भाजपमध्ये गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असं एकनात शिंदे म्हणाले होते. त्यावेळी शिंदे मातोश्रीवर रडले होते, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला.