Akola Fraud : अकोल्यात एका बिल्डरविरुद्ध दुसऱ्या बिल्डरची फसवणुकीची तक्रार, प्लॅट असलेली जागा खाली भूखंड म्हणून पुन्हा विकला
सदर प्लॉटवर बनलेल्या इमारतीमधील फ्लॅटचा इसार पावती केलेल्यांची सुद्धा फसवणूक केली. अशी तक्रार बांधकाम व्यावसायिक भजानलाल पारवानी यांनी खदान पोलीस ठाण्यात दिली आहे.
अकोला : स्थानिक खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मलकापूर गाव येते. मलकापुरातील एक भूखंड करारनामा करून विकासाकरिता घेण्यात आला. बांधकाम व्यावसायिकाची (Builders) भूखंड मालक व त्याच्या अन्य एका बांधकाम व्यावसायिक साथीदाराने फसवणूक केली. अशी तक्रार बांधकाम व्यावसायिकाने खदान पोलीस ठाण्यात दिली आहे. शहरातल्या मलकापूर परिसरात बांधकाम व्यावसायिक संजय लोढीया (Sanjay Lodhia) यांच्या मालकीचा एक भूखंड होता. सदर भूखंड हा त्यांनी करारनामा करीत भजानलाल पारवानी यांना विकासाकरिता दिला होता. सदर भूखंडावर चार मजली इमारत बांधण्याचा प्लॅन ठरला होता. त्यानुसार भूखंड विकासक भजनलाल पारवानी (Bhajanlal Parwani) यांनी इमारतीमधील चारही फ्लॅटची विक्री करून ईसार पावती तयार करून घेतली होती.
इमारत असताना खुला भुखंड म्हणून जागा विकली
सदर बाब ही संजय लोढीया यांनासुद्धा माहिती होती. सोबतच बांधकाम साईटवर याच प्रकरणातील बांधकाम व्यावसायिक संतोष हेडा हेसुद्धा भूखंड मालक संजय लोढीया यांच्यासोबत आले होते. यावेळी त्यांनासुद्धा सदर इमारतीतील चारही फ्लॅटचा ईसार झाला असल्याची माहिती असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. संतोष हेडा यांनी सदर इमारत बांधलेल्या प्लॉटची खरेदी केली. काही दिवसांनी ज्या मूळ लोकांना इमारतीमधील फ्लॅटचा ईसार करून दिला होता. त्यांनी विकासक भजनलाल पारवानीयांना सांगितले की, सदर इमारतीच्या जागेचा सौदा दुसऱ्या कोणासोबत झाला आहे. त्याबाबत खरेदी विक्री कार्यालयातून माहिती घेतली असता दिसले. सदर भूखंडाच्या विक्रीचा व्यवहार हा संतोष हेडा यांच्यासोबत झाला आहे. विशेष म्हणजे सदर भूखंडावर इमारत असतानासुद्धा सदर जागेची खुला भूखंड म्हणून खरेदी करण्यात आली आहे.
ईसारा पावती केलेल्यांचीही फसवणूक
गैरअर्जदार संजय लोढीया आणि संतोष हेडा यांना सदर फ्लॅटचा ईसार झाला असल्याची माहिती होती. तरीही त्यांनी आपसात सदर प्लॉटचा व्यवहार केला. आपली आणि सदर प्लॉटवर बनलेल्या इमारतीमधील फ्लॅटचा इसार पावती केलेल्यांची सुद्धा फसवणूक केली. अशी तक्रार बांधकाम व्यावसायिक भजानलाल पारवानी यांनी खदान पोलीस ठाण्यात दिली आहे.