पुणे लोकसभेच्या जागेवरून मविआत बिघाडी होणार; ‘या’ नेत्याने स्पष्टच सांगितले…
या जागेवर राष्ट्र्वादी काँग्रेसकडून दावा सांगण्यात आला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीतील हा नवा वाद आता पुन्हा एकदा उफाळून आल्याचे दिसून येत आहे.
अहमदनगर : राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलेला असतानाच आता महाविकास आघाडीतील वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. एकीकडे पुणे लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढविणार असल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केल्यानंतर आता त्या जागेवरून आता हा वाद उफाळून आला आहे. पुणे लोकसभेच्या जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाकडून दावा सांगण्यात आले आले आहे. त्यामुळे आता ही जागा नेमकी कोण लढविणार आहे याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी याविषयी बोलताना सांगितले की, पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून ती लढविण्याची शक्यता आहे.
याविषयी बोलतान बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, पुण्याच्या लोकसभेची जागा कॉग्रेसने लढवली होती. त्यामुळे ही ही जागा काँग्रेसकडून लढविली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या जागेवर राष्ट्र्वादी काँग्रेसकडून दावा सांगण्यात आला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीतील हा नवा वाद आता पुन्हा एकदा उफाळून आल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून ही चर्चा केली जाईल, मात्र ही जागा काँग्रेसने लढविली होती, त्यामळे ही जागा काँग्रेसकडून लढविणार असून त्याबाबत वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चाही होईल असंही त्यांनी यावेळी सांगितले.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडून शिवसेनेवर महाप्रबोधन यात्रेतून वारंवार घणाघात केला जातो. त्यावरूनच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सुषमा अंधारे यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे. त्यावरूनही बाळासाहेब थोरात यांनी तानाजी सावंत यांचे कान टोचले आहेत.
तानाजी सावंत यांच्यावर टीका करताना काय बोलावं, काय बोलू नये याचे तारतम्य ठेवले पाहिजे असा सल्ला त्यांनी त्यांना दिला आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, सुषमा अंधारे या प्रचारक आहेत, त्या पक्षाच्या बाजू मांडत आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलताना नेत्यांनी काही तरी तारतम्य बाळगले पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
तर याच वेळी नितेश राणे आणि संजय राऊत यांच्या वक्तव्याबद्दलही बोलताना त्यांनी सांगितले की, जे बोलतात, जे टीका करतात त्यांच्यासाठी काही तरी आचारसंहिता ठेवली पाहिजे असा सल्ला त्यांनी राऊत आणि राणे यांना दिला आहे.