शिंदे गटाच्या नियुक्त्यांवरून वाद, जिल्हाप्रमुखांनाच मारहाण; घरातील साहित्याची तोडफोड

गोपीकिशन बाजोरिया हे यापूर्वी संपर्कप्रमुख होते. परंतु, नव्या नियुक्त्यांमध्ये बाजोरिया यांना बाजूला सारत खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे संपर्कनेता म्हणून जबाबदारी देण्यात आली.

शिंदे गटाच्या नियुक्त्यांवरून वाद, जिल्हाप्रमुखांनाच मारहाण; घरातील साहित्याची तोडफोड
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 10:17 AM

अकोला : अकोल्यात शिंदे गटातच वाद निर्माण झालाय. शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विठ्ठल सरफ यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्याच पक्षाच्या बाजोरीया यांच्या व्यक्तीने विठ्ठल सरफ यांना मारहाण केली. घरात घुसून घरातील साहित्याची फेकफाक केली. काल झालेल्या शिंदे गटाच्या नियुक्त्यांवरून वाद झाल्याची चर्चा आहे. गोपीकिशन बाजोरिया यांचं संपर्कप्रमुख पद काढून टाकण्यात आले. बुलढाणाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे देण्यात आलं आहे. विठ्ठल सरफ यांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. बाजोरिया यांच्या व्यक्तीच्या विरोधात ही तक्रार दाखल केली आहे. हा सर्व घटनाक्रम काल रात्री घडला. शिंदे गटाचे योगेश बुंदेले यांनी विठ्ठल सरफ यांना मारहाण केल्याची तक्रार आहे. शिवाय घरात घुसून घरातील साहित्याची फेकफाक करण्यात आली आहे.

शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर

गोपीकिशन बाजोरिया हे यापूर्वी संपर्कप्रमुख होते. परंतु, नव्या नियुक्त्यांमध्ये बाजोरिया यांना बाजूला सारत खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे संपर्कनेता म्हणून जबाबदारी देण्यात आली. शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विठ्ठल सरफ आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आरोप करत त्यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण करण्यात आली. याशिवाय घराची तोडफोड करण्यात आली आहे. यासंबंधात सरफ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. बाजोरिया यांच्या सांगण्यावरून ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे अकोल्यात शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. योगेश बुंदेले हे बाजोरिया यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे बाजोरिया यांच्याविरोधातच तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अशा करण्यात आल्या नियुक्त्या

प्रतापराव जाधव – अकोला आणि बुलढाणा लोकसभा, आशिष जायस्वाल – अमरावती आणि भंडारा-गोंदिया लोकसभा, कृपाल तुमाने – नागपूर आणि रामटेक लोकसभा येथील संपर्कनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय किरण पांडव यांची वर्धा आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा, भावना गवळी – यवतमाळ-वाशिम आणि चंद्रपूर लोकसभा अशाप्रकारे विदर्भात शिवसेनेच्या नेत्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या नियुक्यांमुळे काही जण नाराज आहेत. त्यावर हा वाद झाल्याची चर्चा आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.