यवतमाळकरांना मोठा दिलासा, जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक अंकावर

कोरोनाच्या या लाटेला थांबविण्यात यवतमाळ जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा फक्त 5 टक्याच्या आता आहे.

यवतमाळकरांना मोठा दिलासा, जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक अंकावर
CORONA
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 5:18 PM

यवतमाळ : जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोनाने हाहाकार माजविला होता. यवतमाळ जिल्ह्यात मृत्यू दर सोबतच संसर्गाचा दही मोठ्या प्रमाणात वाढला होता. एका दिवसात साधारण 1000 पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या जिल्ह्यात होती. आता मात्र जिल्ह्यात हा आकडा एका अंकावर आलाय. कोरोनाच्या या लाटेला थांबविण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा फक्त 5 टक्याच्या आता आहे. सध्या जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 0.50 टक्के इतका आहे (Corona infection in Yavatmal control by district administration).

यवतमाळ जिल्ह्यात मार्च व एप्रिल या महिन्यात जिल्ह्यात कोरोनाच्या हाहाकार होता. शासकीय रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध नव्हते. ऑक्सिजनची कमतरता होती. रुग्णालयात बेड अभावी रुग्णांचा मृत्यू होत होता. जिल्ह्यातील खासगी शासकीय रुग्णालयात एकही बेड शिल्लक नव्हता अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता मात्र जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात पुरेसे बेड आहेत. शिवाय खासगी रुग्णालय सुद्धा नॉन कोविड झाले आहे.

ट्रॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग या सूत्राद्वारे कोरोनाच्या संसर्गाला आळा

जिल्ह्यात आता कोरोना आलेख कमी झाला आहे. त्याचे कारण म्हणजे ट्रॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग या सूत्राद्वारे कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यात यश आलं आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आला की त्याच्या संपर्कात असलेल्यांचे ट्रेसिंग करून त्यांना ट्रॅक करून टेस्टिंग मोठ्या प्रमाणात केल्या गेल्या. या काळात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढली, मात्र तेवढ्याच मोठ्या प्रमाणात रुग्ण बरेही झाले. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडता आली. आरटीपीसीआर (RTPCR) चाचणीवर मोठा भर दिला गेला.

जिल्ह्यातील टेस्टिंग लॅबची क्षमता वाढून टेस्टिंग मोठ्या प्रमाणात करण्यात आली. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी मदत झाली, असं मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केलं.

जिल्ह्यात सद्यपरिस्थिती मागील 5 दिवसांची आकडेवारी

  • 10 जुलै – 3 पॉझिटिव्ह – 0 मृत्यू
  • 9 जुलै – 0 पॉझिटिव्ह – 0 मृत्यू
  • 8 जुलै – 2 पॉझिटिव्ह – 0 मृत्यू
  • 7 जुलै – 4 पॉझिटिव्ह – 0 मृत्यू
  • 6 जुलै – 3 पॉझिटिव्ह -0 मृत्यू
  • 5 जुलै – 2 पॉझिटिव्ह – 0 मृत्यू

मागील 5 दिवसात बघितले तर 14 जण फक्त पॉझिटिव्ह आहेत, तर एकही मृत्यू नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 57 हजार 291 जणांचे लसीकरण सुद्धा झाले आहे. नागरिकांमध्ये तपासणी आणि लसीकरणाबाबत बऱ्यापैकी जनजागृती झालीय. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचं दिसून येत आहे.

हेही वाचा :

यवतमाळमध्ये दरवर्षी जीर्ण पुलामुळे संपर्क तुटतो, अखेर गावकऱ्यांची थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात धाव

विदर्भात 150 ते 200 कोटी वर्षांपूर्वी समुद्र असल्याचा दावा, यवतमाळमध्ये सापडले दुर्मिळ जीवाश्मांचे अवशेष

यवतमाळ येथे 25 लाखांचे परवानगी नसलेले बिटी बियाणे जप्त; पोलीस व कृषी विभागाची कारवाई

व्हिडीओ पाहा :

Corona infection in Yavatmal control by district administration

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.