अजबच! पठ्ठ्याने चिकन खाऊनच कोरोना सेंटर सोडले; हट्टापुढे डॉक्टरही नमले
सांगलीच्या कोरोना सेंटरमध्ये एक अजबच प्रकार पाहायला मिळाला. एका रुग्णाने खाण्यासाठी चक्क चिकनची फर्माईश केली. चिकन दिलं तरच मी कोरोना सेंटरमधून डिस्चार्ज घेईल, नाही तर इथेच राहीन असा हट्टच या पठ्ठ्याने धरला. (Corona patient left covid Centre after eating chicken in Sangli)
सांगली: सांगलीच्या कोरोना सेंटरमध्ये एक अजबच प्रकार पाहायला मिळाला. एका रुग्णाने खाण्यासाठी चक्क चिकनची फर्माईश केली. चिकन दिलं तरच मी कोरोना सेंटरमधून डिस्चार्ज घेईल, नाही तर इथेच राहीन असा हट्टच या पठ्ठ्याने धरला. एवढेच नव्हे तर चिकन मिळावं म्हणून थयथया नाचायलाही लागला. त्यामुळे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय इतकेच नव्हे तर त्याच्या कुटुंबीयानेही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण गडी ऐकेल तर शपथ! अखेर रुग्णालय प्रशासनालाच नमतं घ्यावं लागलं. या रुग्णाला त्याच्या फर्माईशीनुसार चिकन देण्यात आलं. त्यानेही चिकनवर मनसोक्त ताव मारला अन् मगच कोरोना सेंटर सोडलं. सध्या सांगलीत चिकन खाऊनच कोरोना सेंटर सोडणाऱ्या या रुग्णाची चर्चा सुरू आहे. (Corona patient left covid Centre after eating chicken in Sangli)
सांगली जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता पलुस तालुक्यात नगरपरिषदेतील काँग्रेस नगरसेवकांनी कोव्हिड सेंटर सुरू केले आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्या पेशंटची येथील कोरोना केअर सेटरमध्ये शाही बडदास्त ठेवण्यात येत आहे. अंडी, मटण यासह फळे भाजीपाला युक्त सकस पोषक आहार देण्यावर कोरोना केअर सेंटरवर भर देण्यात येत आहे. मात्र कोरोना सेंटरमध्येच मजबूत खुराक खायाला मिळत असल्याने रुग्ण सेंटर सोडायला तयार होत नाहीत, असं नगर परिषदेचे गटनेते वसंत पुदाले यांनी सांगितलं.
अन् चिकनसाठी नाचू लागला
पलुसमधील डॉ. पतंगराव कदम कोव्हिड सेंटरमध्ये एक अजबच प्रकार पाहायला मिळाला. डिस्चार्ज मिळालेला एक रूग्ण चक्क येथे चिकन खाल्ल्याशिवाय जाणार नाही म्हणून नाचायला लागला. इतर दाखल रुग्णांनी त्याचा व्हिडीओ करून सोशल मीडियावर व्हायरल केल्यानं इथल्या चिकनप्रेमी रुग्णाची चर्चा शहरात चवीने चर्चिली जात आहे. संजय सलगर असं या रुग्णाचं नाव आहे. सलगर रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्याची अंडी, मटण, यासह फळे भाजीपाला युक्त सकस पोषक आहार मिळत असल्याने चैनी सुरू होती. रोज घरामधील जेवण आणि इथल्या जेवणात फरक असल्याने त्याला डिस्चार्ज घ्यायला नको वाटत होते. त्याला 7 जुलै रोजी 5 वाजता डिस्चार्ज मिळाला. पण त्याने चिकन खाऊनच बाहेर पडणार असल्याचं सांगितलं. त्याने चिकनसाठी हट्टच धरला. चिकनसाठी नाचायला लागला. त्यामुळे कोव्हीड सेंटरमधील रुग्णही हसून हसून लोटपोट झाले. तर रुग्णाच्या या विचित्र वागण्याने रुग्णालय प्रशासनही अवाक् झाले. शेवटी त्याला एकदाचं चिकन आणून दिलं. चिकनवर मनसोक्त ताव मारल्यानंतर त्याने रात्री 9 वाजता रुग्णालय सोडलं आणि घर गाठलं. (Corona patient left covid Centre after eating chicken in Sangli)
संबंधित बातम्या:
VIDEO: “चिकन खाल्याशिवाय इथून जाणार नाही”, सांगलीत डिस्चार्ज मिळालेल्या कोरोना रूग्णाचा अनोखा हट्ट
मोठी बातमी! मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे मागे; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
पंकजा मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला, चर्चांना उधाण
मराठा आरक्षण प्रश्नावर तीन पक्षांची ठगेगिरी; शेलार म्हणतात, ‘कितने आदमी थे’!
(Corona patient left covid Centre after eating chicken in Sangli)