Chandrapur Corona | चंद्रपुरात परतला कोरोना; 16 दिवसांनंतर महिला पॉझिटिव्ह, रुग्ण कोविड सेंटरमध्ये

गेल्या 16 दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता. त्यामुळं आता या महिलेला कोरोना कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Chandrapur Corona | चंद्रपुरात परतला कोरोना; 16 दिवसांनंतर महिला पॉझिटिव्ह, रुग्ण कोविड सेंटरमध्ये
चंद्रपुरातील कोविड सेंटर. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 3:51 PM

चंद्रपूर : जिल्ह्यात गेले 16 दिवस कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. आता वृद्ध महिला पॉझिटिव्ह (Positive) सापडली. ती महिला बल्लारपूर तालुक्यातील रहिवासी आहे. संबंधित महिलेच्या घरी वृद्ध पती-पत्नी वास्तव्याला आहेत. कोरोनाबाधित झाल्याची पुष्टी झाली. त्यानंतर महिलेला जिल्हा रुग्णालय (Hospital) परिसरातील कोविड उपचार (Covid Treatment) इस्पितळात दाखल केले. महिलेच्या नमुन्यातील कोरोनाच्या नेमक्या व्हेरियंटबाबत आरोग्य यंत्रणा पाठपुरावा करीत आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. देशात काही ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे. अशात हा रुग्ण सापडला असल्यानं चंद्रपूर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. लक्षणं आढळल्यास पुन्हा तपासणी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय.

2 मे रोजी सापडला होता पहिला रुग्ण

चंद्रपूर जिल्ह्यात 2 मे 2020 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. शहरातील कृष्णनगर भागातील हा 50 वर्षीय इसम 1 मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात लक्षणे आढळल्यानंतर दाखल झाला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली होती. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेले. दरम्यान, गेल्या 16 दिवसांपासून जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता. त्यामुळं आता या महिलेला कोरोना कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

3 दिवसांपूर्वीचं अमरावतीत कोरोनाबळी

अमरावती जिल्ह्यातील घाटलाडकी येथील बारा वर्षाच्या मुलीचा कोरोनामुळे दुर्देवी मृत्यू झाला. तिच्यावर अमरावतीच्या कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. 25 एप्रिल रोजी या मुलीला कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी तिचा मृत्यू झाला. 19 मार्चनंतर कोरोना मुळं हा पहिला मृत्यू जिल्ह्यात झाला आहे. त्यामुळं अमरावती पाठोपाठ चंद्रपुरात कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळं कोरोना आता विदर्भातही हातपाय पसरतोय की, काय अशी भीती वाटायला लागली आहे.

हे सुद्धा वाचा

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.