Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी आमदार, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर छळाचे आरोप, आता पारनेरच्या तहसीलदारांविरोधात स्फोटक अहवाल

जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची सुसाईड ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया आल्या. मात्र, आता याच तहसीलदार देवरे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेत.

आधी आमदार, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर छळाचे आरोप, आता पारनेरच्या तहसीलदारांविरोधात स्फोटक अहवाल
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 11:17 AM

अहमदनगर : जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची सुसाईड ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया आल्या. मात्र, आता याच तहसीलदार देवरे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेत. याबाबतचा चौकशी अहवाल अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी उपविभागीय आयुक्तांकडे सादर केलाय. या अहवालात महिला तहसीलदार देवरे यांच्यावर गंभीर ठपका ठेवण्यात आलाय. त्यामुळे आता पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसत आहे.

तहसीलदार देवरे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सादर केलेल्या अहवालात अनेक घोटाळे उघड झाल्याचं बोललं जातंय. देवरे यांनी अनेक कामांमध्ये हस्तक्षेप करून हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. याशिवाय वाळू साठ्यातही गैरव्यवहार करून शासनाचे मोठं नुकसान केल्याचा आरोप आहे. जमीन प्रकरणात गैरव्यवहार करणे, शरतील कोविड सेंटर, हॉस्पिटल विरोधात चौकशी करून कागदपत्रे सादर न करणे, शासकीय कामात नितांत सचोटी व कर्तव्यपरायणता न ठेवणे आणि आपली कामाची जबाबदारी नीटपणे पार न पाडणे, कामात हयगय करणे आणि वरिष्ठांच्या आदेशाचा भंग करणे असे अनेक गंभीर आरोप तहसीलदार देवरे यांच्यावर करण्यात आलेत.

तहसिलदारांवर जबाबदारी पालनात अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचा ठपका

देवरे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 म नियम 3 च्या तरतुदीचा भंग केल्याचे प्रथमदर्शनी दिसू येत असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात म्हटलंय. डेडीकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर, पूर्णावाद भवन इमारत, ओंकार हॉस्पिटलच्या समोर नवी पेठ पारनेर विरुध्द तक्रारीच्या अनुषंगाने तपासणी करताना तहसिलदार पारनेर यांनी चौकशी समितीस कोणतीही कागदपत्रे उपलब्ध करून न देणे याचाही अहवालात उल्लेख आहे. यावरून तहसिलदार पारनेर यांच्यावर जबाबदारी पालनात अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय.

हेही वाचा :

आमदारासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप करत आत्महत्येचा इशारा, अहमदनगरच्या तहसिलदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

पारनेर तहसीलदारांच्या ऑडिओ क्लिपवरुन मोठी खळबळ; आरोपांबाबत आमदार निलेश लंकेंचं उत्तर काय?

पारनेरच्या तहसीलदाराचा ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा इशारा, चित्रा वाघ यांचा निलेश लंकेंवर हल्लाबोल

व्हिडीओ पाहा :

Corruption and many allegations on Parner Tehsildar Jyoti Devare in Ahmednagar collector report

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.