हल्ली राजकीय टक्कर होत आहे, गावागावात टक्कर होणारचं; अशोक चव्हाण असं का म्हणालेत?

नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारीसाठी बी फॉर्म कोरा दिला होता. त्यामुळे वडिलांऐवजी मुलांना उमेदवारी देता आली असती. मात्र तसे झाले नाही.

हल्ली राजकीय टक्कर होत आहे, गावागावात टक्कर होणारचं; अशोक चव्हाण असं का म्हणालेत?
अशोक चव्हाण
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 9:26 PM

नांदेड : जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील वासरी येथे आज रेड्याच्या टकरीची स्पर्धा घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाची बंदी असताना देखील रेड्याच्या टकरी घेण्यात आल्या. विशेष म्हणजे माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात हा प्रकार घडला. याबाबत अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना विचारलं असता त्यांनी खोचक टीका करत उत्तर दिलं. हल्ली राजकीय (Political) टकरी इतक्या होत आहेत. तेव्हा गावा-गावांत टकरी होणारच ना. पण मी याचं समर्थन करत नाही. चुकीच्या गोष्टी घडू नये ही अपेक्षा आहे. राजकीय टकरी होतात तर आपल्या टकरीच काय असं लोकांनां वाटलं असेल असं चव्हाण म्हणाले.

नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारीसाठी बी फॉर्म कोरा दिला होता. त्यामुळे वडिलांऐवजी मुलांना उमेदवारी देता आली असती. मात्र तसे झाले नाही.

हा गंभीर प्रकार असल्याची खंत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलीय. या घटनेमुळे नाशिकची परंपरागत जागा काँग्रेसने गमावल्याने नुकसान झालेय, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी व्यक्त केलीय.

विकास कामांना स्थगिती देणे योग्य नाही

मुंबई मनपाच्या कामावरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका केलीय. ठाकरेंच्या या सुरात सूर अशोक चव्हाण यांनी देखील सूर मिळवले आहेत. राज्यातील विकासकामांना स्थगिती देणं योग्य नाही.

त्यातून राज्याचे नुकसान होत असल्याची टीका चव्हाण यांनी केलीय. राजकारणातील आरोप प्रत्यारोप चालू राहू द्या. पण विकासकाम थांबवू नये, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केलीय.

कुठल्या घोड्यावर बसायचे हे त्यांनी ठरवावे

पंकजा मुंडे यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे असल्याचं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केले. याबाबत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी देखील प्रतिक्रिया दिलीय. पंकजा मुंडे या कर्तृत्ववान नेत्या आहेत. त्यांना काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे.

यावर मी भाष्य करणे उचित नाही. त्या हुशार नेत्या आहेत. समजदार आहेत. विद्यमान राजकीय परिस्थिती त्या जाणतात. त्यामुळे कुठल्या घोड्यावर बसल्यास फायदा होतो, हे त्यांनी ठरवावं, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.