Datta Jayanti | दिगंबरा दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा… च्या जयघोषात नरसोबावाडीमध्ये दत्त जयंती उत्साहात साजरी…

मार्गशीर्ष महिन्याला खूप पवित्र मानले जाते. या महिन्याच अनेक सण येतात. याच महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. या वेळी दत्त जयंती 18 डिसेंबर शनिवार म्हणजे आज आहे. दत्त हे त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते.

Datta Jayanti | दिगंबरा दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा... च्या जयघोषात नरसोबावाडीमध्ये दत्त जयंती उत्साहात साजरी...
दत्त जयंती
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 8:24 AM

मुंबई : मार्गशीर्ष महिन्याला खूप पवित्र मानले जाते. या महिन्याच अनेक सण येतात. याच महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी (Datta Jayanti 2021) केली जाते. या वेळी दत्त जयंती 18 डिसेंबर शनिवार म्हणजे आज आहे. दत्त हे त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे रूप मानले जाते. दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

कोरोनाच्या नियमांचे पालन करून दत्त जयंती साजरी

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे दत्त जयंती साध्या पध्दतीने साजरी केली जात होती. मात्र, यावेळी कोरोनाचे नियम पाळून दत्त जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नरसोबावाडी येथे गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे दत्त जयंती साजरी केली जात नव्हती. पण यावेळी नियमांचे काटेकोरपणे पालन करून दत्त जयंती उत्सवाला सुरू झाली आहे.

सकाळपासून काकड आरती भजन कीर्तन सुरू आहे. तसेच दत्त मंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात आले आहे. विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.  कर्नाटक, महाराष्ट्र, सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक आदी भागातून दत्त दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. कोल्हापूर प्रशासनाकडून व दत्त देवस्थान समितीकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नरसोबावाडीमध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी

दिगंबरा दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा… च्या जयघोषामध्ये आज अवघी नरसोबावाडी दुमदुमली आहे. दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिर परिसरामध्ये कळसाचे दर्शन घेतले आहे. मंदिरामध्ये आकर्षक रांगोळी काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे दर्शनासाठी येणारे नागरिक हे मास्क खालूनच मंदिर परिसरामध्ये येत आहेत. तसेच कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये. याकरीता प्रशासनाकडून देखील खबरदारी घेतली जात आहे.

संबंधित बातम्या : 

TET Exam : टीईटी परीक्षेत गैरप्रकाराचा संशय, पुणे पोलिसांकडून MSEC चे आयुक्त तुकाराम सुपेंना अटक

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्म समभावाची नाही’, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं पुन्हा वाद उफाळणार?

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.