कोरोना रुग्णसंख्या कमी होईना, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर रुग्ण संख्या कमी होत नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. दोन्ही नेते कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे | Ajit pawar Rajesh Tope Kolhapur Corona

कोरोना रुग्णसंख्या कमी होईना, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री उद्या कोल्हापूर दौऱ्यावर
अजित पवार आणि राजेश टोपे
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 8:59 AM

कोल्हापूर : राज्याच्या इतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरी कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती अजूनही जैसे थे आहे. जिल्ह्यात आजही दिवसाला जवळपास हजार ते दीड हजार नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. तर किमान तीस जणांचा मृत्यू होतो. कोल्हापूर जिल्ह्याच्या चिंताजनक परिस्थितीची दखल आता खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी घेतली आहे. (DCM Ajit Pawar And health Minister Rajesh Tope Will Visit kolhapur Due to Corona patient Case did not decrease)

अजितदादा-आरोग्यमंत्री उपाययोजनांची माहिती घेणार

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तसंच प्रशासनाकडून राबवल्या जात असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी अजित पवार आणि राजेश टोपे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात ते प्रशासकीय प्रमुखांसह लोकप्रतिनिधींनी सोबत ते बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी देखील संवाद साधण्याची शक्यता आहे.

उद्याच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर भर

कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट आजही 15 टक्क्यांहून अधिक आहे. तर मृत्यूचे प्रमाण देखील तीन टक्क्यांपर्यंत आहे. दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लॉकडाऊनला कोल्हापूरकरांनी दिलेला संमिश्र प्रतिसाद, सुरुवातीच्या लक्षणांकडे केलेलं दुर्लक्ष, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची अपुरी यंत्रणा, टेस्टिंगचे वाढलेले प्रमाण, त्याचबरोबर बाहेरील जिल्ह्यातून कोल्हापुरात उपचारासाठी येणारे रुग्ण, अशी काही कारण जिल्ह्यातील रुग्ण वाढीसाठी प्रथमदर्शनी दिसत आहेत.

या व्यतिरिक्त काही त्रुटी राहत आहेत का किंवा या व्यतिरिक्त कोणती कारण असू शकतात याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. या बैठकीबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून त्या अनुषंगाने माहिती संकलनासाठी अधिकाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

साताऱ्याची अशीच स्थिती, दादांच्या बैठकीनंतर परिणाम दिसला, आता कोल्हापुरात काय होणार

काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्याची देखील काहीशी अशीच परिस्थिती होती.. यावर मुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊन अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली होती. या झाडाझडती नंतर मात्र साताऱ्यातील रुग्ण संख्या काहीशी कमी होतेय. याच पार्श्वभूमीवर उद्या कोल्हापुरात होत असलेली अजितदादांची बैठक किती परिणामकारक असेल हे काही दिवसातच कळेल.

(DCM Ajit Pawar And health Minister Rajesh Tope Will Visit kolhapur Due to Corona patient Case did not decrease)

हे ही वाचा :

काँग्रेसमध्ये ज्यांचे कोणी नाही त्यांच्यासोबत मी आहे; नितीन राऊतांचा कार्यकर्त्यांना ग्वाही

ठाकरे-चव्हाणांनी दिल्लीवारी करून लोकांना वेड्यात काढलं; आरक्षणासाठी 27 जून रोजी मुंबईत बाईक रॅली: मेटे

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.