मिरजेच्या वादग्रस्त जागेबाबत निर्णय; गोपीचंद पडळकर यांनी दिला हा इशारा
ब्रम्हानंद पडळकर यांचा प्लाट असल्यानं मला बदनाम करायचं. यासाठी विरोधकांना काही भांडवल पाहिजे होतं. म्हणून तक्रार केली होती, असा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला.
सांगली : मिरजचे (Miraj) तहसीलदार यांनी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचे भाऊ ब्रम्हानंद पडळकर यांचा मिरज येथील प्लाट ताब्यात घेतला होता. याबाबत मिरजचे तहसीलदार यांनी निकाल दिला. ब्रम्हानंद पडळकर यांच्या नावे ७८४ -१ अ प्लाट आहे. तक्रारदारांचा प्लाट हा ७८४ -१ ब आहे. या प्लाटचा त्या १७ लोकांचा काळीमात्र संबंध नाही. असा या निकालाचा निष्कर्ष आहे. त्यामुळं पुढं कुणी त्या प्लाटवर अतिक्रमण करण्याचा किंवा बेकायदेशीर ताब्या घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर पडळकर यांच्याकडून योग्य ती कारवाई केली जाईल.
गोपीचंद पडळकर म्हणाले, माझ्या आणि माझ्या भावाच्या बद्दल काही जणांनी बदनामीकारक स्टेटमेंट केल्या आहेत. न्यायालायाचा निकाल घेऊन अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहोत.
रस्ता रहदारीचा होता
तक्रारदार १७ जणांचा ब्रम्हानंद पडळकर यांच्या प्लाटशी काडीमात्र संबंध नाही, असं निकालात स्पष्ट झालं आहे. ताबाही आमचाच आहे. अतिक्रमण केलं गेलं तेव्हा ते पाडलं गेलं होतं. कारण तो रस्ता रहदारीचा होता, असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.
म्हणून रात्री बांधकाम पाडलं
मिरज जंशन रोडच्या जवळ प्लाट असल्यानं दिवसा वाहनं असतात. म्हणून रात्री बांधकाम पाडलं होतं. ब्रम्हानंद पडळकर यांचा प्लाट आहे. त्यामुळं ते काय करतील ते बघतील, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.
अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार
ब्रम्हानंद पडळकर यांचा प्लाट असल्यानं मला बदनाम करायचं. यासाठी विरोधकांना काही भांडवल पाहिजे होतं. म्हणून तक्रार केली होती, असा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला. आता गोपीचंद पडळकर यांनी त्या बदनामी करणाऱ्यांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हंटलं.