मोठी बातमी ! बाळासाहेब ठाकरे यांचं नाव तुम्हीच बाजूला करा; दीपक केसरकर यांचं थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान

अजित पवारांनी निर्दयीपणे कोकणातील पैसे काढले तेव्हा हुँ की चूँ केलं नाही. अजितदादांच्या समोर बोलायची तुमची कधी हिंमत झाली नाही. खुर्ची सांभाळण्यासाठी कोकणातल्या लोकांवर अन्याय केला.

मोठी बातमी ! बाळासाहेब ठाकरे यांचं नाव तुम्हीच बाजूला करा; दीपक केसरकर यांचं थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान
deepak kesarkarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 8:59 AM

शिर्डी : आमचा पक्ष चोरला, चिन्हं चोरलं. माझ्या वडिलांचं नावही चोरलं. हिंमत असेल तर तुमच्या वडिलांचं नाव घेऊन निवडणुकीला सामोरे जा. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरल्याशिवाय आता मोदींनाही मते मिळत नाहीत, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर केली होती. खेड येथील सभेतून उद्धव ठाकरे यांनी हा हल्ला चढवला होता. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या या विधानाच खरपूस समाचार घेतला आहे. आम्ही नाही. तुम्हीच बाळासाहेब ठाकरे यांचं नाव बाजूला करा, अशा शब्दात दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे.

दीपक केसरकर यांनी मीडियाशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दीपक केसरकर सहकुटुंब शिर्डीत आले होते. काकड आरतीला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले त्यामुळे तुम्हीच त्यांचं नाव बाजूला करा. शिवसेनेसाठी आम्ही आमदारक्या पणाला लावल्या. तुमच्याबद्दलचा आदर तसाच रहावा असं वाटतं असेल तर संयमाने बोला, असा इशाराच त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

हे सुद्धा वाचा

खोटी लाट निर्माण करू नका

सत्ता गेल्याची खात्री झाल्यावर औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर केल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. ज्या मुंबईची आजपर्यंत लूट झाली तिला न्याय देण्याचं काम सुरू आहे. आजही तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जाताय. ज्या शरद पवारांनी अनेकदा शिवसेना फोडली त्यांच्याबरोबर तुम्ही जाताय. जे काही गेलं त्यामागे तुम्ही घेतलेले निर्णय कारणीभूत आहेत. सहानुभूतीची खोटी लाट निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. जागे व्हा, काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडा हे आम्ही आसाममधून सुद्धा सांगितलं होतं. खोके घेतले असते तर अडीच वर्ष तुमचं सरकार का टीकलं असतं?, असा सवाल त्यांनी केला.

राऊतांना का अडवलं नाही?

मोदींना संपूर्ण भारतात जो प्रतिसाद मिळतो तो केवळ शिवसेनेमुळे मिळतो का? मोदी तुमच्याशी किती चांगले वागले हे मला माहीत आहे. ज्या मोदींनी हिंदुत्वासाठी लढा दिला त्यांच्याबद्दल सामनामध्ये काय छापत होता? संजय राऊत यांना तुम्ही का आडवू शकला नाही?, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

तुमची हिंमत झाली नाही

अजित पवारांनी निर्दयीपणे कोकणातील पैसे काढले तेव्हा हुँ की चूँ केलं नाही. अजितदादांच्या समोर बोलायची तुमची कधी हिंमत झाली नाही. खुर्ची सांभाळण्यासाठी कोकणातल्या लोकांवर अन्याय केला. कोकणावर अन्याय होत असताना तुमच्या आदरापोटी चूप होतो. जेव्हा तुमच्या हातात होतं तेव्हा कोकणाला का नाही दिलं? ज्या सत्तेपोटी राष्ट्रवादीची लाचारी केली ती सत्ताही तुमच्या हाती राहिली नाही. तुमच्याकडे पक्षाचे नाव आणि चिन्ह होतं तेव्हा कोकणात एक आमदार निवडून आला, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.