Nanded Photograph : नवी दिल्लीतील कलादालनात देगलूरची छायाचित्रे, किरण मुधोळकरांचा राजधानीत डंका

नांदेड जिल्ह्यातील विविध नगर परिषदांनी त्यांच्या कार्यालयात व सभागृहात किरणने काढलेल्या जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांची छायाचित्रे अडकवली आहेत. ललित कला अकादमीच्या प्रदर्शन निमित्ताने किरणचा राजधानी नवी दिल्लीत डंका वाजला आहे.

Nanded Photograph : नवी दिल्लीतील कलादालनात देगलूरची छायाचित्रे, किरण मुधोळकरांचा राजधानीत डंका
किरण मुधोळकरांचा राजधानीत डंका Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 3:30 PM

नांदेड : राजधानी नवी दिल्ली येथे ऐतिहासिक वास्तूंची (Historical Buildings), नैसर्गिक छायाचित्रे, कलात्मक पेंटिंग, साकारलेल्या वस्तू यांचे प्रदर्शन नुकतेच आयोजित करण्यात आले आहे. 19 ते 28 ऑगस्टपर्यंत हे प्रदर्शन प्रेक्षकांना पाहता येणार आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय व ललित कला अकादमी यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त व जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून हे आयोजन करण्यात आलं. या कलादालनात देगलूरचे (Degalur) छायाचित्रकार किरण मुधोळकर (Kiran Mudholkar) यांच्या छायाचित्रांची निवड झाली आहे. ऐतिहासिक छायाचित्र प्रकारात देशभरातून 1 हजार 603 जणांनी आपली छायाचित्रे पाठविली होती. त्यातील 135 जणांच्या छायाचित्रांची (दोन बाय तीन स्क्वेअर फूट आकार) निवड करण्यात आली. त्यात किरण मुधोळकरचा समावेश आहे, देगलूरकरांसाठी ही आनंदाची बाब आहे.

सिद्धेश्वर मंदिराचे छायाचित्र झळकले

देगलूरचे युवा व हौशी छायाचित्रकार किरण मुधोळकर यांनी पाठविलेले होट्टल येथील ऐतिहासिक सिद्धेश्वर मंदिराचे छायाचित्र या प्रदर्शनात झळकले आहे. निवड करण्यात आलेल्या छायाचित्रकारांची नावे प्रदर्शनस्थळी तसेच ललित कला अकादमीच्या संकेत स्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

किरणची शेकडो छायाचित्र प्रसिद्ध

आपल्या वडिलांनी सुरू केलेला कमर्शियल फोटोग्राफीचा व्यवसाय पुढे नेत किरण मुधोळकर याने त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. मराठवाड्यातील तसेच महाराष्ट्रातील अनेक अग्रगण्य वृत्तपत्रात किरणने काढलेली देगलूर शहरातील अनेक सार्वजनिक समस्यांची, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक कार्यक्रमांची तसेच निसर्ग छायाचित्रे शेकडो छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. नांदेड जिल्ह्यातील विविध नगर परिषदांनी त्यांच्या कार्यालयात व सभागृहात किरणने काढलेल्या जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांची छायाचित्रे अडकवली आहेत. ललित कला अकादमीच्या प्रदर्शन निमित्ताने किरणचा राजधानी नवी दिल्लीत डंका वाजला आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.