Devrao Dudhalkar | सेवादलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते देवराव दुधलकर यांचे निधन, चंद्रपुरात उद्या सकाळी होणार अंत्यसंस्कार

देवराव दुधलकर यांनी आपल्या राजकीय तथा सामाजिक जीवनात बालपणापासूनच निस्वार्थ व निरपेक्ष भावनेने काम केले. काँग्रेस सेवादलाचा खंदा व शिस्तबद्ध कार्यकर्ता अशी त्यांची देशभरात ओळख होती. अतिशय सन्मानाचा समजला जाणाऱ्या सेवादलाच्या ‘नेहरू अवॉर्ड‘ ने (Nehru Award) त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

Devrao Dudhalkar | सेवादलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते देवराव दुधलकर यांचे निधन, चंद्रपुरात उद्या सकाळी होणार अंत्यसंस्कार
सेवादलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते देवराव दुधलकर यांचे निधनImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 11:35 AM

चंद्रपूर : काँग्रेस सेवादलाचे (Congress Seva Dal) माजी प्रांत संघटक तथा सामाजिक कार्यकर्ते दलितमित्र देवराव दुधलकर (Devrao Dudhalkar) यांचे आज 12 एप्रिल 2022 रोजी सकाळी 6.15 वा. चंद्रपूर येथे निधन झाले. ते 88 वर्षाचे होते. काही दिवसांपासून ते आजारी होते. आपल्या राजकीय तथा सामाजिक जीवनात बालपणापासूनच त्यांनी निस्वार्थ व निरपेक्ष भावनेने काम केले. काँग्रेस सेवादलाचा खंदा व शिस्तबद्ध कार्यकर्ता अशी त्यांची देशभरात ओळख होती. अतिशय सन्मानाचा समजला जाणाऱ्या सेवादलाच्या ‘नेहरू अवॉर्ड‘ ने (Nehru Award) त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

उद्या सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार

1977 साली त्यांना महाराष्ट्र शासनाच्या दलितमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पंडित नेहरू, आचार्य विनोबा भावे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ. ना. सू. हर्डीकर आदी थोरपुरुषासोबत त्यांनी कार्य केले होते. देवरावजी दूधलकर यांची अंत्ययात्रा त्यांच्या एकोरी वार्ड येथील निवासस्थानाहून उद्या 13 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता निघेल व अंत्यविधी मोक्षधाम बिनबा गेट, चंद्रपूर येथे संपन्न होईल.

आग्रह होऊनही निवडणूक लढविली नाही

1958 मध्ये नागपुरात झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाच्या व्यवस्था विभागाचे ते प्रमुख होते. त्यावेळी स्वयंसेवक विभागाचा प्रमुख रुग्णालयातून संपूर्ण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवून असल्याचे समजताच पं. नेहरू अक्षरश: भारावले. देवरावजींना भेटण्यासाठी ते रुग्णालयात गेले होते. सेवादलाच्या कार्यासाठी देवराव यांनी संपूर्ण भारतात भ्रमण केले. त्यांनी कधी सत्ता-संपत्तीचा मोह बाळगला नाही. निवडणूक लढविल्यास सेवादलाच्या कामाकडे दुर्लक्ष होईल, म्हणून त्यांनी निवडणूक लढविली नाही. देवराव यांनी आपले अख्खे आयुष्य या संघटनेसाठी दिले. या कार्यकर्त्यांजवळ स्वत: चे वैयक्तिक आयुष्य राहिलेच नव्हते. वेळप्रसंगी त्यांनी कुटुंबियांचा, नातेवाईकांचा रोषही पचवला.

शिक्षकी पेशाचा दिला राजीनामा

देवराव दुधलकर गेल्या 70 वर्षापासून सेवादलाच्या माध्यमातून सेवा करीत होते. गांधीजींचे जीवनमूल्य समजून घेतलेले काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते होते. सेवा करत असताना त्यांना घरादाराकडे, कुटुंबाकडे दुर्लक्ष करावे लागले. स्वत:च्या मुलाबाळांचे पालकत्व पत्नीकडे सोपवून दिले. सेवादलाच्या तरुण कार्यकर्त्यांचे, वसतिगृहातील गरीब मुला-मुलींचे पालकत्व त्यांनी स्वीकारले होते. पं. जवाहरलाल नेहरू, विनोबा भावे अशा थोरपुरुषांच्या सहवासात देवरावजी घडले. 1958 साली शिक्षकी पेशाचा राजीनामा दिला. देशात चंद्रपूर जिल्हा काँग्रेस सेवादलाचे कार्य सर्वात उत्तम ठरले. देवरावजी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या विधायक कार्याची ही साक्ष होती.

Devrao Dudhalkar passed away | उत्कट समर्पणशीलतेचा; सेवादलीय कार्यकर्ता

Buldana Politics | काँग्रेस, भाजपच्या नेत्यांची जवळीकता! आमदार फुंडकरांचे सारथी बनले ज्ञानेश्वर पाटील; चर्चा तर होणारच

Nagpur Metro Video | नागपूर मेट्रोच्या लिफ्टिंग होलमधून वाळू पडतेय, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.