अकोला : पोलीस प्रशासनाला (Police Administration) काळीमा फासणारी घटना अकोल्यात उघडकीस आली. ट्रेन क्रमांक 12111 मुंबई – अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये 6 जून च्या मध्यरात्री ही घटना घडली. 6 जूनच्या रात्री गाडी क्रमांक 12111 नाशिक स्टेशनवरून 11.45 वाजताच्या सुमारास पुढच्या प्रवासाला निघाली. या ट्रेनमध्ये पोलीस विभागात (Police Department) काळीमा फासणारी एक घटना घडली. ठाणे येथे कार्यरत पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत होता. चक्क नग्नावस्थेत धिंगाणा घालत असल्याने बोगीत एकच खळबळ उडाली. ठाणे येथे पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेला अमरसिंग रमेश अहेराव नामक पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत होता. तो चक्क नग्न होऊन S /7 कोचमध्ये महिला प्रवाशांसमोर धिंगाणा घालत होता. त्यामुळं गाडीमध्ये एकच खळबळ उडाली. जगाला कायद्याचे ज्ञान शिकवणारे पोलीसच कायद्याचे उल्लंघन (Violation of Law) करत असेल तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न उभा राहतो. अमरसिंग अहेराव हा कल्याणवरून विनाटिकीट गाडीमध्ये बसला. प्रवास करीत असताना नग्नावस्थेत बर्थवर धिंगाणा घालत असल्याचे काही प्रवाशांना नाशिकजवळ लक्षात आले.
काही महिला प्रवाशांनी बोगीमध्ये कार्यरत असलेले तिकीट परीक्षकांना याची माहिती दिली. तिकीट परीक्षकांनी त्याला विचारणा केली. आपण ठाणे येथे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहोत. कल्याण येथून गाडीमध्ये बसलो असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आपल्या वर्दीचा फायदा घेत रेल्वेमध्ये विनातिकीट प्रवास करतात. कोणत्या कायद्या अंतर्गत पोलिसांना रेल्वेमध्ये बिनातिकीट फिरण्याचा अथवा मद्य पिऊन धिंगाणा घालण्याचा अधिकार दिला आहे? अशा पोलीस कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवणार तरी कोण? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. याचे गांभीर्य ओळखून पोलीस कर्मचाऱ्यांच्या व प्रशासनाच्या कार्यावर निश्चितच प्रश्न उभा राहतो. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हा पोलीस कर्मचारी विनाटिकीत प्रवास करत होता. बर्डवर असताना त्याने कपडे काढले. तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचं प्रवाशांनी सांगितलं. ही बाब लक्षात येताच काही प्रवाशांनी त्याच्यावर चपाट्या लावल्या. पण, तो काही एकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला काही सुद नव्हती. त्यानंतर त्याला जबरजस्तीनं कपडे घालून देण्यात आले. या दारुड्या पोलिसावर आता काय कारवाई होते, हे पाहावं लागेल.