Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खाकी वर्दीतल्या माणुसकीचं दर्शन, आगीत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबाला महिन्याचा किराणा वाटप

खाकी वर्दीतील पोलिसांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारा प्रसंग धुळे जिल्ह्यात समोर आला आहे. Police Help to family in dhule

खाकी वर्दीतल्या माणुसकीचं दर्शन, आगीत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबाला महिन्याचा किराणा वाटप
पोलिसांच्या माणुसकीचं दर्शन
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 12:08 PM

धुळे: खाकी वर्दीतील पोलिसांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारा प्रसंग धुळे जिल्ह्यात समोर आला आहे. गॅस सिलेंडरच्या स्फोटात संपूर्ण घर जळून खाक झालेल्या कुटुंबाला पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्याकडून किराणा साहित्य वाटप करण्यात आलंय. पोलीस अधिकारी पदाचं कर्तव्य बजावत असताना दुर्गेश तिवारींनी दाखवलेल्या माणुसकीचं दर्शन सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. (Dhule Dondaicha Police Inspector Durgesh Tiwari help family who lost all things due to fire outbreak)

पोलिसांच्या वर्दीतही माणूस

पोलीस म्हटलं की आपण दूरच राहावं अस अनेकांच्या मनात भावना असते. या खाकीवर्दी मागे अनेक वेळेस भीतीही दडलेली असते. परंतु, याच खाकी मागे हाडामासाचा आणि भावनाशील असलेला माणूस देखील लपलेला आहे. याचाच प्रत्यय शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या निमित्तानं दिसून आला आहे.

पीडित कुटुंबाचं काय होणार हा विचार

दोन दिवसापूर्वी शिंदखेडा तालुक्यातील रहीम पुरे गावात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले होते. कुटुंबा समोर आता अस्मानी संकट उभे राहिलेलं होतं. क्षणात होत्याचं नव्हतं झालं, या कुटुंबाच्या डोळ्यासमोर त्यांचं घर जळून खाक झालं होतं. याचवेळी आपलं कर्तव्य म्हणून दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी घटनास्थळी आले होते. पंचनामा कागदपत्रांची जमवाजमव या एकूण सगळ्या शासकीय कामकाजाची पूर्तता करत असताना तिवारी यांच्या डोक्यात कुटुंबाचं पुढं काय हा विचार आला. एकीकडे अशी कोरोनाची परिस्थिती तर दुसरीकडे आर्थिक चक्र थांबलेले असताना या पीडित कुटुंबावर आलेल संकट, असे अनेक प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होते.

महिनाभर पुरेल इतका किराणा देत मायेचा हात

खाकीतला माणसाच्या मनात कुटुंबाला मदत करण्याचं आलं. कुटुंबाला थोडाफार का होईना! मदतीचा हातभार लागावा. डोळ्यातील ओलेचिंब वाहणारे अश्रू पुसता यावे म्हणून पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी कर्तव्य पार पाडत या पिडीत कुटुंबाला महिनाभर पुरेल इतका किराणा साहित्य भेट देऊन या दुःखी परिवाराचे सांत्वन केलं. मायेचा हात डोक्यावर फिरवून खाकी वर्दीतील खऱ्या माणुसकीचा दर्शन या अधिकार्‍याकडून पाहावयास मिळाल आहे. निस्वार्थपणे आपले कर्तव्य बजावत असताना अशा संकटापायी पीडित गोरगरिबांसाठी धावून येणाऱ्या खाकी वर्दीतील देवदूत माणसाचं सर्व स्तरावरून मन भरून कौतुक देखील व्यक्त होत आहे. या पीडित कुटुंबांना आधार देण्याकरिता याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष लोले, पोलीस कर्मचारी योगेश पाटील, वाहन चालक संजय गुजराथी, पोलीस पाटील राजेश बेडसे, माजी सरपंच दिनेश बेडसे, मनोहर पाटील, नकुल पाटील, विश्वास पाटील, निंबा पाटील, चंद्रकांत पाटील मुकेश पाटील, उ. खा. पाटील आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रात 28 जिल्ह्यात कोरोनाचं संकट पसरलं, लॉकडाऊन हाच पर्याय? वाचा सविस्तर

प्रत्येक महिन्याला कमवा बक्कळ पैसा, Post Office ची खास योजना, वाचा किती होणार फायदा?

(Dhule Dondaicha Police Inspector Durgesh Tiwari help family who lost all things due to fire outbreak)

वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला.
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा.
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला.
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी.
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.