Video | अकोल्यातील पहिलीतील परिधीला गिरक्या घेताना बघीतलं का?, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद..!
अकोल्यातील परिधीने फार मोठा विक्रम केलाय. परिधीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदविलंय. कारण काय ते जाणून घ्याच.
अकोला : जिल्हातल्या मूर्तिजापूर येथील परिधी विनायक राऊत (Periphi Vinayak Raut). स्व. परमानंद मालाणी (Parmanand Malani) इथं इयत्ता पहिलीमध्ये शिकते. परिधीने कर्तृत्ववाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंद करण्याचा विक्रम केलाय. एका सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याची ही मुलगी (the daughter of a farmer). या स्पर्धेची माहिती यू-ट्यूबवरून तिच्या पालकांना मिळाली. परिधीने चिकाटी आणि जिद्दीने सराव केला. त्याचा व्हिडीओ तयार करण्यात आला. तो इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी जानेवारी महिन्यात पाठविण्यात आला. परिधी या परीक्षेत यशस्वी ठरली. यश प्राप्त करून एक आदर्श लहान मुलांसमोर ठेवला. तिने स्वतःभोवती 360 अंश कोणता न थांबता 30 सेकंदात 18 गिरक्या घेत हा विक्रम साधला आहे.
कुठलेही प्रशिक्षण घेतले नाही
परिधीच्या नावाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. त्याबद्दल तिला इंडिया बुक रेकॉर्डतर्फे मेडल पारितोषिक व प्रमाणपत्र तसेच इंडिया रेकॉर्ड बुक पाठवण्यात आले आहे.देशपातळीवर विक्रमासाठी कुठलेही विशेष प्रशिक्षण घेतले नाही. प्रचंड सराव करून ही कला परिधीने आत्मसात केले. घरी पाळण्याला दोरी बांधून विशिष्ट प्रकारे गिरकी घेण्याचा ती सातत्याने सराव करीत होती. खडतर परिश्रमातून तिने हे यश प्राप्त केले आहे. आई-वडिलांचे प्रोत्साहन व कुटुंबीयांनी तिच्यावर विश्वास दाखविला. याच विश्वासाने यश गाठल्याचे तिने सांगितले. स्व. परमानंद मालानी शिक्षण केंद्राच्या अध्यक्षा श्रीमती गिताबाई मालानी तसेच प्राचार्य व शिक्षकांनी तिचे कौतुक केले आहे, अशी माहिती परिधीची आई प्राची राऊत यांनी दिली.
पाहा व्हिडीओ
— Govind Hatwar (@GovindHatwar) February 13, 2022
इतर मुलींसाठी प्रेरणादायी
परिधी राऊत ही पहिलीत शिकत असली, तरी तिची इच्छाशक्ती फार मोठी आहे. या इच्छाशक्तीच्या जोरावर तिने हे यश मिळवले आहे. लहान मुलांसाठी प्रेरणादायी अशी ही घटना आहे. या मुलीकडून बऱ्याच मुली प्रेरणा घेतील आणि आपआपल्या आवडीच्या क्षेत्रात यश मिळवतील, अशी अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही.