Chandrapur Crime | दिवाणजी रक्कम घेऊन जात होते, चोरट्यांनी पैशांची बॅग लांबविली, चंद्रपुरात दुकानातील नोकरच निघाले आरोपी

सुलभ प्रोवीजन दुकानातील दिवसभराची रक्कम घेऊन दिवाणजी बँकेत जात होते. ही बाब दुकानातील नोकरांना माहीत होती. त्यांनीचं दिवाणजीला रस्त्यात अडविले. पण, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली.

Chandrapur Crime | दिवाणजी रक्कम घेऊन जात होते, चोरट्यांनी पैशांची बॅग लांबविली, चंद्रपुरात दुकानातील नोकरच निघाले आरोपी
चंद्रपुरात दुकानातील नोकरच निघाले आरोपी Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 10:08 AM

चंद्रपूर : चंद्रपुरात दुकानातील नोकरच आरोपी निघाले. शहरातील सुलभ प्रोविजन (Sulabh Provision) या दुकानातून बँकेत रक्कम नेली जात होती. दुकानातील दिवाणजी व्यवसायाची रक्कम घेऊन जात होते. 1 लाख 78 हजार रुपयांची रक्कम घेऊन जात असलेल्या दिवाणजीला रस्त्यात अडवण्यात आले. चोरट्यांनी रकमेची बॅग लांबवली. अत्यंत वर्दळीच्या मुख्य मार्गालगत एका गल्लीत ही रक्कम लुटली. तक्रार प्राप्त होताच शहर पोलिसांनी (City Police) तपास सुरू केला. प्राथमिक माहिती आणि सीसीटीव्हीतील पोशाखावरून दुकानातील नोकरावर संशय बळावला. पोलिसांनी रूपेश नामक नोकराला ताब्यात घेत विचारपूस केली. त्याने साथीदारांची नावे उलगडली. रुपेश लांडगे (Rupesh Landage) या नोकराने ताज कुरेशी आणि रितीश वालकोंडावार या दोघांच्या संगनमताने हा कट रचला. पोलिसांनी 3 आरोपींसह रोख रक्कम ताब्यात घेतली. या प्रकरणी त्वरीत आरोपी पकडल्याने व्यापारी संघटनांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.

अशी घडली घटना

सुलभ प्रोवीजन दुकानातील दिवसभराची रक्कम घेऊन दिवाणजी बँकेत जात होते. ही बाब दुकानातील नोकरांना माहीत होती. त्यांनीचं दिवाणजीला रस्त्यात अडविले. पण, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. पोशाख पाहिल्यानंतर पोलिसांनी दुकानातील नोकरांवर संशय आला. त्यांनी त्यांची चौकशी केली. तेव्हा दुकानातील नोकरच चोर असल्याचं स्पष्ट झालं. पावणेदोन लाख रुपये लंपास करण्याचा नोकरांचा डाव होता. पण, योग्य पद्धतीनं तपास केल्यानं आरोपी त्वरित सापडलेत. याबद्दल दुकानदारानं पोलिसांचे आभार मानले.

चोरीच्या घटनांमुळे भीती

ब्रम्हपुरी शहराच्या बाहेरील भागांना चोरट्यांनी लक्ष्य केलंय. महिनाभरात अनेक घरफोड्या करण्यात आल्यात. मंगळवारी रात्री ज्ञानी वार्डात राम उरकुडे यांच्याकडं कुणीही नसल्याचं चोरट्यांनी हेरलं. आलमारीत ठेवलेली रोकड व सोन्याचे दागिने लंपास केलेत. एक लाख 80 हजार रुपयांचा ऐवज होता. मदतीसाठी श्वान पथक बोलावण्यात आलं. पण, तरीही चोरांचा पत्ता अद्याप लागला नाही. या वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळं ब्रम्हपुरी शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.