Nanded Crime : नांदेडमध्ये अल्पवयीन मुलीवर लौंगिक अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला अटक

पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी नराधम डॉ.विकास सुंकरवार याला तातडीने ताब्यात घेतले. त्याच्याविरूद्ध भादंविच्या कलम 376, पोस्को 4, 6 व इतर वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंके यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक घुले या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Nanded Crime : नांदेडमध्ये अल्पवयीन मुलीवर लौंगिक अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला अटक
नांदेडमध्ये अल्पवयीन मुलीवर लौंगिक अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 8:54 PM

नांदेड : स्वतःच्या खाजगी दवाखान्यात कामासाठी असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर सातत्याने लैंगिक अत्याचार (Sexually Abusing) करणाऱ्या डॉक्टराला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. डॉ.विकास सुंकरवार असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट शहरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. किनवट शहराच्या डॉक्टरलेन भागात डॉ.विकास सुंकरवारच्या दवाखान्यात एक अल्पवयीन मुलगी गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी म्हणून कार्यरत होती. डॉ.सुंकरवार याने सदर मुलीस वेगवेगळी आमिषे दाखवत आणि धमकी देत नोव्हेंबर 2021 ते मार्च 2022 या कालावधीत तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित अल्पवयीन मुलीने केला. (Doctor arrested for sexually abusing minor girl in Nanded)

पीडितेच्या जबाबावरुन आरोपीला अटक

अत्याचारामुळे अल्पवयीन पीडिता ही गर्भवती राहिली आहे. काल पीडितेच्या पोटात दुखत असल्याने तिला नातेवाईकांनी शहरातील एका नामांकित दवाखान्यात आणले. तेथील डॉक्टरांनी पीडितेची तब्येत पाहून तिच्या काही चाचण्यांसाठी अन्य एका दवाखान्यात पाठविले. चाचणीपूर्वीच सदर पीडितेचा गर्भपात झाल्याने तिला तातडीने गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी इन कॅमेरा जबाबात पीडितेने डॉ.विकास सुंकरवार यानेच आपल्यावर अत्याचार करुन हे कुकर्म केल्याचा जबाब पंचासमक्ष नोंदवला. पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी नराधम डॉ.विकास सुंकरवार याला तातडीने ताब्यात घेतले. त्याच्याविरूद्ध भादंविच्या कलम 376, पोस्को 4, 6 व इतर वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंके यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक घुले या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. (Doctor arrested for sexually abusing minor girl in Nanded)

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.