पाऊस पडावं म्हणून असं काही केलं की गावात चर्चा जोरात

गाढव सजवून त्याची शहरात मिरवणूक काढण्यात आली. या गाढवाच्या लग्नाची अनोख्या कार्यक्रमाची चांगली चर्चा सुरू आहे.

पाऊस पडावं म्हणून असं काही केलं की गावात चर्चा जोरात
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 9:51 PM

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात अद्यापपर्यंत बळीराजांनी म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. पाऊस न पडल्याने बळीराजा हवालदिल झाला. पाऊस पडावा म्हणून बळीराजा देवालाही साकडं घालत असतो. जून महिना संपला तरी पेरणी योग्य पाऊस पडला नाही. मुरूम शहरातील शेतकऱ्यांनी या नक्षत्राचे वाहन असलेल्या गाढवाचे लग्न निसर्गाबरोबर लावून दिले. गाढव सजवून त्याची शहरात मिरवणूक काढण्यात आली. या गाढवाच्या लग्नाची अनोख्या कार्यक्रमाची चांगली चर्चा सुरू आहे.

चक्क गाढवाचेच लगीन लावून दिले आहे. गाढवांना नवरदेवाप्रमाणे सजवून त्यांच्या गळ्यात हार घालत वाजत गाजत त्यांची गावभर मिरवणूक काढली. मोठ्या थाटामाटात गाढवाचं लग्न लावून देण्यात आले. हे वरूण राजाला साकडं घालण्यासाठीच गाढवाचे लग्न लावल्याचं गावकरी सांगत आहेत.

अशी आहे लोकांची धारणा

वेळेत पाऊस नाही झाला किंवा पेरण्यानंतर दीर्घ ओढ दिल्यास आणि ठिकाणी ज्या त्या वेळेतील नक्षत्राच्या वाहनांची कार्यक्रम घेतली जातात. अगदी बेडकाचीही लग्न लावले जाते. देवाला पाण्यात ठेवणे गाढवाचे लग्न गाढवाची मिरवणूक काढण्यात आले. पाऊस पडतो अशीही धारणा ग्रामीण भागात प्रचलित असल्याने यातूनच मुरूम शहरात गाढवाचे लग्न लावण्यात आले.

धोंडी मागून वरूण राजाला साकडे

पावसाळा सुरू होऊन महिनाभराचा कालावधी संपला तरी वाशिम जिल्ह्यात कुठेही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. लांबणीवर गेलेल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील खरिपातील ८० टक्के पेरण्या रखडल्या. मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील ग्रामस्थांनी धोंडी मागुन वरूण राजाला साकडे घातले आहे.

जुन्या रुढी परंपरांचे पालन

यावेळी जुन्या रूढी परंपराना उजाळा देत गावातील नागरिकांनी कमरेला लिंबाचे डहाळे बांधून ‘धोंडी धोंडी पाणी दे दे दाय दाणा पिकु दे’ अशा स्वरूपात वरूण राजाकडे पावसाचे साकडे घालण्यात आले. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आजही ग्रामीण भागात पावसाला प्रसन्न करण्यासाठी जुन्या रूढी परंपराचे पालन केल्या जात आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.