तुळजापूर : महाराष्टाची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव 29 सप्टेंबर पासून मंचकी निद्रेने सुरू होणार असून यंदा कोरोना संकट असल्याने मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद असल्याने भक्ताविना हा सण साजरा करण्यात येणार आहे.
मंचकी निद्रेनंतर 7 ऑक्टोबरला तुळजाभवानी देवीची मूर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापना करून घटस्थापना करण्यात येणार आहे. हा उत्सव 15 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. मात्र कोरोनाचे सावट असल्याने भक्तांना प्रवेश मिळणार नसल्याने भविकात नाराजीचा सूर आहे तर उत्सव साधेपणाने साजरा होणार असल्याने पुजारी व व्यापारी यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
मंदिर बंद असले तरी सर्व धार्मिक विधी पूजा परंपरेनुसार साजरे केले जाणार आहेत.29 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार आयोजित करण्यात आले आहेत.
शारदीय नवरात्र महोत्सवास २९ सप्टेंबर रोजी मंचीकी निद्राने सुरुवात होणार आहे. या काळात देवीची मुर्ती शेजघरात निद्रेसाठी ठेवली जाते.७ ऑक्टोबर रोजी देवीच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापनाकरून घटस्थापना होणार आहे. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्याच्या सर्व सीमा नवरात्र काळात भाविकासाठी बंद केल्या होत्या. त्यामुळे देवी दर्शनासाठी भाविक तुळजापुरला येऊ शकले नव्हते.
8 ऑक्टोंबर रोजी श्री देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबीना, 9 ऑक्टोंबर रोजी रथअलंकार महापूजा, 10 ऑक्टोंबर रोजी ललित पंचमी असल्याने मुरली अलंकार महापूजा, 11 ऑक्टोंबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा, 12 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा, 13 ऑक्टोबरला महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा,14 ऑक्टोंबर रोजी घटोत्थापन व 15 रोजी विजयादशमी दसरा असल्याने पहाटे सिमोल्लंघन हा विधी होणार आहे. त्यांनतर १९ ऑक्टोबर रोजी मंगळवारी कोजागीरी पोर्णिमानंतर श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने अन्नदान अशा प्रकारे शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होईल.
तुळजाभवानी देवीच्या नवरात्र उत्सव काळात सर्व विधी तुळजाभवानी मंदिर संस्थान पुजारी मंडळाच्या मदतीने करणार आहे.
(Due to Corona,Tuljabhavani Navratra festival will have to be celebrated without devotees this year)
हे ही वाचा :
Ganesh Visarjan 2021 | आज अनंत चतुर्दशी, जाणून घ्या गणेश विसर्जनाची पद्धत…
अनंत चतुर्दशीची तिथी, शुभ वेळ आणि महत्व जाणून घ्या; विष्णु देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ‘हे’ करा