बुलडाण्यात ढगफुटीसदृश पाऊस, नदी-नाल्यांना पूर, धरणाच्या भिंतीवरून पाणी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
जिल्ह्यातील चिखली तालुक्यात तर पावसाचे रौद्र रुप पाहायला मिळाले. आज (28 जून) सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्यामुळे अंबाशी, आमखेड, खैरवसह परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे.
बुलडाणा : मागील कित्येक दिवस दांडी मारल्यानंतर आता राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात पाऊस बरसतो आहे. बुलडाणा जिल्ह्यातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातील चिखली तालुक्यात तर पावसाचे रौद्र रुप पाहायला मिळाले. आज (28 जून) सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्यामुळे अंबाशी, आमखेड, खैरवसह परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. (due to heavy rain in Buldhana Chikhli lood in river water coming out of dam)
नदी-नाल्यांना पूर
चिखली तालुक्यात आज सायंकाळी ढगफुटी सदृश पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील अनेक शेतांत पाणी साचले आहे. तसेच नदी-नाल्यांना पूर आला आहे. नदी तसेच नाले, ओढे यांना पूर आल्यामुळे काही शेतात पाणी घुसले आहे.
धरणाच्या भिंतीवरून वाहतंय पाणी
पाटोदा, एकलारा मंगरूळ नवघरे, अंबशी परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. शिवाय आंबशी येथील धरणाच्या भिंतीवरून पाणी वाहत आहे. धरण पूर्ण भरल्यामुळे पाणी गावात घुसले आहे. तसेच धरणाचे पाणी थेट गावामध्ये घुसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
पाहा व्हिडीओ :
पाझर तलावाला भगदाड
बुलडाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यात काही गावांत पाणीच पाणी साचले आहे. ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे अंबाशी आणि आमखेड येथील पाझर तलावाला भगदाड पडले आहे. तसेच या तलावाला भगदाड पडल्यामुळे अंबाशी गावात पाणी घुसले आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातील शेताचेही मोठे नुकसान झाले आहे.
इतर बातम्या :
Video | कपडे धुण्यासाठी गेलेल्या चार भावांना कृष्णा नदीत जलसमाधी, कुटुंबीयांचा आक्रोश
Nashik | नाशिक शहरात निर्बंधांची कठोर अमलबजावणी, व्यापाऱ्यांनी केली 4 वाजता दुकानं बंद
अरुंद आणि कच्चा रस्ता बनला धोकादायक, डंपरची दोन चाकं चक्क हवेत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
(due to heavy rain in Buldhana Chikhli lood in river water coming out of dam)