ईडी अ‍ॅक्शन मोडवर, जरंडेश्वर प्रकरणी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटीस

साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील चिमणगावमधल्या चर्चित जरंडेश्वर कारखान्याच्या कर्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईडीने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटीस पाठवलेली आहे. (ED Notice Satara District bank over Jarandeshwar Sugar mill)

ईडी अ‍ॅक्शन मोडवर, जरंडेश्वर प्रकरणी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटीस
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला ईडीची नोटीस आलेली आहे. जरंडेश्वर प्रकरणी ईडी अ‍ॅक्शन मोडवर आली आहे.
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 2:36 PM

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला (Satara District bank) ईडीची (ED) नोटीस आलेली आहे. जरंडेश्वर प्रकरणी ईडी अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील चिमणगावमधल्या चर्चित जरंडेश्वर (Jarandeshwar) कारखान्याच्या कर्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ईडीने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोटीस पाठवलेली आहे. (ED Notice Satara District bank over Jarandeshwar Sugar mill)

जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज प्रकरणाची चौकशी

सातारा जिल्हा बँकेने जरंडेश्वरला 96 कोटींचे कर्ज दिले असल्याच्या खुलाशाबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा बँकेने कर्ज देताना कोणत्या आधारावर दिलं, कागदपत्रांची पूर्तता नेमकी कशी केली गेली होती, कर्ज प्रकरणाची प्रोसेस नेमकी कशी झाली, ही प्रोसेस होताना नियम आणि अटींचं पालन झालं होतं का? अशा पद्धतीने ईडी तपास करु शकते.

त्यामुळे आता सातारा जिल्हा बँकेला ईडीच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहे. ईडीने दिलेल्या मुदतीपर्यंत जिल्हा बँकेला ईडीच्या नोटीसीला उत्तर द्यावं लागणार आहे.

जरंडेश्वरला चार बँकांनी कर्ज दिल्याची माहिती समोर

सध्या जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात असून पुणे जिल्हा बँकेसह जरंडेश्वरला चार बँकांनी कर्ज दिल्याची माहिती समोर आली आहे. आता या कर्ज प्रकरणात सातारा जिल्हा बँकेचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ईडीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं सातारा जिल्हा बँकेला द्यावी लागणार आहेत.

जरंडेश्वर ईडीच्या रडारवर का?

आघाडी सरकारच्या काळात अजित पवार शिखर बँकेचे अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी को ऑप बँकेचे अध्यक्ष होते. त्या काळात या बँकेत कथित 25 हजार कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. तर जो जरंडेश्वर कारखाना अवसायनात निघाला, जो कवडीमोल भावाने विकल्याच आरोप आहे, तो कारखाना सुद्धा अजित पवारांच्या नातेवाईकाचा आहे. राजेंद्र घाडगे हे अजित पवारांचे मामा या बँकेचे चेअरमन आहेत. यांच्याच कार्यकाळात दोन दिवसापूर्वी ईडीने या कारखान्यावर जप्तीची कारवाई केली.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सुमारे 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. याबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 22 ऑगस्ट 2019 रोजी हा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्याच्या आधारावर ईडीने आपला गुन्हा दाखल केला करून तपास सुरू केला होता. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. अशी या कारवाई मागचं ढोबळ कारण आहे.

(ED Notice Satara District bank over Jarandeshwar Sugar mill)

हे ही वाचा :

जरंडेश्वर प्रकरण A टू Z, अजित पवार ED च्या रडारवर का आहेत? सोपं कारण

काय आहे जरंडेश्वर कारखाना प्रकरण, अजित पवारांचा नेमका संबंध काय? 

जरंडेश्वर साखर कारखाना ईडीकडून सील, ED ची कारवाई नेमकी कुणावर? अजित पवारांनी काय सांगितलं?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.