सांगलीच्या इतिहासातील ईडीची 53 तास जम्बो चौकशी, राजाराम बापू बँकेत अधिकाऱ्यांचं ठाण; ‘त्या’ पाच व्यापाऱ्यांचं काय होणार?

सांगलीतील पाच व्यापाऱ्यांची ईडीने तब्बल 53 तास चौकशी केली आहे. या चौकशीनंतर आज पहाटे ईडीचे अधिकारी मुंबईला परतले. सांगलीच्या इतिहासातील ही पहिलीच एवढी मोठी चौकशी असल्याचं सांगितलं जात आहे.

सांगलीच्या इतिहासातील ईडीची 53 तास जम्बो चौकशी, राजाराम बापू बँकेत अधिकाऱ्यांचं ठाण; 'त्या' पाच व्यापाऱ्यांचं काय होणार?
ED RaidImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 9:11 AM

सांगली : गेल्या दोन दिवसांपासून सांगलीत ईडीने छापेमारी केली आहे. ईडीने सांगलीतील प्रसिद्ध उद्योजक पारेख बंधू यांच्यासह इतर पाच व्यापाऱ्यांच्या घरी छापेमारी केली आहे. या व्यापाऱ्यांच्या घर, कार्यालय आणि आस्थापनाच्या ठिकाणी ईडीचे अधिकारी ठाण मांडून होते. इतकेच नव्हे तर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याचवेळी या व्यापाऱ्यांची खाती असलेल्या बँकेत जाऊनही कसून तपासणी केली. या व्यापाऱ्यांच्या प्रत्येक खात्याची तपासणी करतानाच प्रत्येक एन्ट्री ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासली. तब्बल 53 तास ही चौकशी सुरू होती. सांगलीत असं कधीच घडलं नव्हतं. सांगलीच्या इतिहासातील ईडीची ही जम्बो छापेमारी असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे सांगलीत एकच खळबळ उडाली आहे.

इकडे मुंबईत कोरोना काळातील कोव्हिड घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. त्यामुळे संपूर्ण मीडियाचं लक्ष मुंबईतील छापेमारीवर लागलेलं असतानाच त्याचवेळी ईडीने सांगलीतील पारेख बंधू यांच्यासह पाच इतर व्यापाऱ्यांच्या घरावर एकाचवेळी धाड मारली. तब्बल 60 ईडीच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळी पथकं तयार करत या व्यापाऱ्यांच्या घरावर छापेमारी केली. त्यामुळे एकच खळबळ माजली. पण ईडीचे अधिकारी पाच सात तास चौकशी करून निघून जातील असं वाटलं होतं. मात्र, हे अधिकारी दोन दिवस झाले तरी निघाले नाही. तब्बल 53 तास चौकशी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगली सोडली. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या हाती काय लागले? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

हे सुद्धा वाचा

53 तास तळ ठोकून

पाच व्यापाऱ्यांच्या घरी झाडाझडती सुरू असतानाच ईडीच्या अधिकाऱ्यांनी इस्लापूर पेठ येथील राजाराम बापू बँकेच्या शाखेत जाऊन या व्यापाऱ्यांच्या खात्यांची चौकशी सुरू केली. ईडीचे 10 ते 12 अधिकारी तब्बल 53 तास राजाराम बापू बँकेच्या शाखेत तळ ठोकून होते. या बँकेबाहेर ईडीच्या अधिकाऱ्यांच्या चार वाहना थांबलेल्या होत्या. तसेच सुरक्षा रक्षकही मोठ्या प्रमाणावर तैनात होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी या पाचही अधिकाऱ्यांच्या प्रत्येक खात्यातील प्रत्येक एन्ट्रीची पाहणी केली. या व्यापाऱ्यांना कधी आणि किती पैसे आले? कुणी पैसे दिले? याची माहिती ईडीने घेतली आहे.

कर्मचारी 53 तासानंतर घराकडे

ही चौकशी पूर्ण झाल्याने तब्बल 53 तासानंतर ईडीचे अधिकारी बँकेतून बाहेर पडले. त्यामुळे बँकेतील 80 कर्मचारी आणि बँकेचे एमडी प्रदीप पवार यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. 53 तास झाडाझडती केल्यानंतर आज पहाटे ईडीचे पथक मुंबईकडे रवाना झाले. त्यामुळे बँकेत अडकून पडलेल्या 80 कर्मचाऱ्यांना 53 तासानंतर घरी जाता आले. सर्व कर्मचारी आज पहाटे 5 वाजता घरी गेले.

राजाराम बापू बँकेची चौकशी नाही

ईडीने चौकशी केलेल्या व्यापाऱ्यांची खाती राजारामबापू बँकेत आहेत. त्यामुळे या खात्याची चौकशी करण्यासाठीच फक्त ईडीचे अधिकारी बँकेत आले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या खात्याची चौकशी केली आहे. राजाराम बापू बँकेची चौकशी करण्यात आलेली नाही. राजाराम बापू बँकेच्या संदर्भात सुरू असलेल्या बातम्या चुकीच्या आहेत, असं बँकेचे चेअरमन प्रा. श्यामराव पाटील आणि एमडी प्रदीप पवार यांनी कालच स्पष्ट केलं आहे.

इतर खात्यांची चौकशी नाही

या पाच व्यापाऱ्यांच्या खात्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही खात्याची ईडीने माहिती किंवा चौकशी केली नाही. राजारामबापू बँकेमध्ये कोणतीही अनियमितता किंवा कोणताही गैरव्यवहार नाही, असे स्पष्टीकरण बँकेचे चेअरमन प्राध्यापक शामराव पाटील आणि एमडी प्रदीप पवार यांनी दिले होते.

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.