Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावात एकनाथ खडसे भाजपवर बरसले; ईडी चौकशीच्या मुद्द्यावरून व्यक्त केली मनातील खदखद !

विरोधकांना काय वाटेल ते वाटेल पण 'मी पुन्हा येईल', असे म्हणत खडसेंनी फडणवीसांचे नाव न घेता त्यांना चिमटा काढला. मी थांबणाऱ्यांमधला नाही. 40 वर्षांच्या राजकीय जीवनात अनेक चढउतार पाहिले आहेत, असे सांगत त्यांनी 'चलते रहो, रुक जाना नही, तू कही हारके, काटो मे चलके मिलेंगे रास्ते बहार के', असे म्हटले.

जळगावात एकनाथ खडसे भाजपवर बरसले; ईडी चौकशीच्या मुद्द्यावरून व्यक्त केली मनातील खदखद !
एकनाथ खडसे
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 5:18 PM

जळगाव : नाथाभाऊने पक्ष बदलला म्हणून तुम्ही कितीही छळ करा, हा काही पहिल्यांदा घडलेला प्रकार नाही. मी आता स्वतः अशी मानसिकता करून घेतली आहे की जे होईल ते होईल. मी काही केलेले नाही, म्हणून काय होईल ते पाहू. नाथाभाऊ मजबूत माणूस आहे. तुम्हाला किती बदनाम करायचे तितके करा, पण मी काही झुकणारा किंवा घाबरणारा नाही. ईडी माझ्यामागे लागली म्हणजे माझा चेहरा पण पडणार नाही. ‘चलते रहना’ अशीच माझी मानसिकता. यांनी कितीही बदनामी केली तरी नाथाभाऊ कसा आहे, हे जनतेला 40 वर्षांत माहिती नाही का? ‘जाहिल यू ही बदनाम है, हमको गम से क्या काम है, ये मुस्कुराती जिंदगी जिंदादिली का नाम है’, असा शेर बोलून दाखवून खडसेंनी भाजपला जोरदार टोला लगावला. (Eknath Khadse Angry on BJP; Expressed on the point of ED interrogation)

अशा पद्धतीने छळणे योग्य नाही

ज्याने भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार केला आहे, त्याला कायद्याने शिक्षा व्हायलाच हवी, या मताचा मी आहे. पण ज्या माणसाच्या चार वेळा चौकशा झाल्या, सीबीआय, इन्कम टॅक्सने केलेल्या चौकशीत काहीही तथ्य निघाले नाही. तरी नंतर अशा पद्धतीने छळणे योग्य नाही. हे निव्वळ राजकारण आहे, हे महाराष्ट्राची जनता जाणून आहे. विरोधकांना काय वाटेल ते वाटेल पण ‘मी पुन्हा येईल’, असे म्हणत खडसेंनी फडणवीसांचे नाव न घेता त्यांना चिमटा काढला. मी थांबणाऱ्यांमधला नाही. 40 वर्षांच्या राजकीय जीवनात अनेक चढउतार पाहिले आहेत, असे सांगत त्यांनी ‘चलते रहो, रुक जाना नही, तू कही हारके, काटो मे चलके मिलेंगे रास्ते बहार के’, असे म्हटले.

जावयाला तरी त्रास द्यायला नको होता

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी, माझी ईडीची चौकशी त्यांनी लावली हे मान्य केले आहे. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. या निमित्ताने महाराष्ट्राला कळले तरी की माझी चौकशी का सुरू आहे. पण अशा रितीने त्रास देणे योग्य नाही. जावयाला तरी असा त्रास द्यायला नको होता. माझ्या जावयाला राजकारण माहिती नाही. त्यांनी आयुष्यात काही केले नाही. गेली 20 वर्षे ब्रिटनमध्ये नोकरी करतोय. पण त्यांना विनाकारण छळले जात आहे. त्यांचा या प्रकरणात व्यवहार फक्त 2 कोटींचा आहे. त्यासाठी देशाची सर्वोच्च यंत्रणा ईडी चौकशी करतेय. महाराष्ट्रातील जनता हे सर्व पाहतेय आणि जनता यांना माफ करणार नाही. योग्य वेळी जनता उत्तर देईल. एखाद्या निरपराध माणसाला त्रास होत असेल तर ते मलाच नाही तर कोणालाही आवडणार नाही. (Eknath Khadse Angry on BJP; Expressed on the point of ED interrogation)

इतर बातम्या

आम्ही राणेंचे कार्यकर्ते नाही, राज ठाकरेंचे सैनिक आहोत, मनसे नेते अविनाश जाधवांनी ललकारले

पीक विमाप्रश्नी पुणे कृषी आयुक्त कार्यालयावर किसान सभेचा मोर्चा, 1 सप्टेंबरला कृषीमंत्र्यांसोबत बैठक

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.