सोलापूरसह राज्यातील 16 जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार, वाचा कोणत्या जिल्ह्यांचा समावेश?

सोलापूरसह राज्यातील 16 जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पाचही जिल्हा बँकांचा यामध्ये समावेश आहे. या 16 बँकांपैकी सोलापूर व नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सध्या प्रशासक नियुक्त आहे.

सोलापूरसह राज्यातील 16 जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार, वाचा कोणत्या जिल्ह्यांचा समावेश?
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 2:49 PM

सोलापूर : सोलापूरसह राज्यातील 16 जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पाचही जिल्हा बँकांचा यामध्ये समावेश आहे. या 16 बँकांपैकी सोलापूर व नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सध्या प्रशासक नियुक्त आहे.

कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये निवडणुका?

पुणे, सोलापूर, सांगली ,सातारा कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील 5, तर कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद तसेच मुंबई, नाशिक, धुळे, नंदुरबार, बुलढाणा व नागपूर बँकेच्या निवडणुका होणार आहेत.

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून सहकार क्षेत्रातील निवडणुका रखडल्या

सहकार खात्याच्या निर्णयानंतर निवडणूक प्राधिकरण निवडणुकीची तयारी करत असल्याची माहिती मिळतेय. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून सहकार क्षेत्रातील निवडणुका थांबल्या होत्या. मात्र, या निर्णयाने या निवडणुकांचा मार्ग मोकळ झालाय.

कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांकडील थकबाकी वाढती

दुसरीकडे सोलापूरमध्ये कर्जमाफी होऊनही शेतकऱ्यांकडील थकबाकी वाढत असल्यानं जिल्हा मध्यवर्ती बँकेने सक्तीच्या कर्ज वसुलीचा निर्णय घेतलाय. त्यासाठी सहकार खात्याच्या अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. यात 101 अन्वये शेतकऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात येणार आहे.

सुलीसाठी कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा निर्णय

2017 नंतर 2019 मध्ये राज्य शासनाने कर्जमाफी केली. कर्जमाफीचा फायदा घेतलेल्या शेतकर्‍यांनी पुन्हा कर्ज उचलले. मात्र, घेतलेले कर्ज पुन्हा थकीत झाले आहे. 2017 च्या कर्जमाफीत न बसलेले किंवा मोठे थकबाकीदार शेतकऱ्यांवर वसुलीसाठी कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा निर्णय प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी घेतला आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात मागील 24 तासांमध्ये कोरोनाचे नवे 565 रुग्ण आढळले आहेत. सोलापूर ग्रामीण भागातील 9 जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय, तर सोलापूर शहरात गेल्या 24 तासात एकाही कोरोना बाधित मृतांची नोंद नाही.

सोलापूरमधील म्युकरमायकोसिस  रुग्णांची संख्या 637 वर

सोलापूर जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे नवे 3 रुग्ण आढळले आहेत. यातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. जिल्ह्यातील एकूण म्युकरमायकोसिस  रुग्णांची संख्या 637 वर पोहचलीय, तर आत्तापर्यंत 38 जणांचा मृत्यू झालाय.

बार्शी तालुक्यात एकाच दिवसात 62 कोरोना रुग्ण

सोलापूरमधील बार्शी शहर व तालुक्यात कोरोना बधितांचा आकडा हळूहळू वाढू लागला आहे. बार्शी तालुक्यात एकाच दिवसात 62 कोरोना रुग्ण आढळले. मागील पाच दिवसात 96 रुग्ण आढळून आल्यानंतर 24 तासात 62 नवे रुग्ण आढळले. यापैकी एक जणाचा कोरोनाने मृत्यू झालाय.

पोलीस आणि ग्रामपंचायतींकडून आठवडी बाजार न भरवण्याचं आवाहन

सोलापूर ग्रामीण भागात आठवडा बाजार भरू नये यासाठी पोलीस आणि ग्रामपंचायतींकडून आवाहन करण्यात आलेय. मागील आठवड्यात वळसंग येथे आठवडा बाजार भरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यामुळेच आता प्रशासनाने हे आवाहन केलंय. टीव्ही 9 मराठीच्या बातम्यांची दखल घेत पोलिसांनी आणि ग्रामपंचायतींनी आठवडी बाजार न भरवण्याचं आवाहन केलंय.

ग्रामपंचायतींकडून सायकलवर स्पीकर लावून बाजारात न येण्यासाठी आवाहन करण्यात येतंय. तसेच नियमांचं पालन न केल्यास कारवाई करण्याचा पोलिसांनी इशारा दिलाय.

हेही वाचा :

सोलापूरमध्ये शाळांची घंटा वाजणार, 8 वी ते 12 वीपर्यंत वर्ग भरवण्याचा मार्ग मोकळा

सोलापूरमध्ये ‘या’ 5 तालुक्यांमध्ये कडक लॉकडाऊन, व्यापाऱ्यांकडून घंटानाद आंदोलन

सहाय्यक कामगार आयुक्तांकडे दहा लाखांच्या खंडणीची मागणी, सोलापुरात तरुण पोलिसांच्या ताब्यात

व्हिडीओ पाहा :

Election of 16 district including Solapur will be soon

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.