Jalgaon Accident : एसटी संपामुळे विद्यार्थीनीचा हकनाक बळी; ओव्हरलोड रिक्षातून दोघी पडल्या; डोक्याच्या चिंधड्या उडून एकीचा मृत्यू

प्रवासात अचानक हात निसटून तोल गेल्याने तृप्ती व तिची मैत्रिण रोहिणी राजेंद्र धनगर या दोन्ही धावत्या रिक्षातून खाली पडल्या. तृप्ती बाहेरच्या साईडने असल्याने तिच्या डोक्याला व मेंदूला गंभीर मार लागला. यानंतर तिला तातडीने बोदवड येथील डॉ.यशपाल बडगुजर यांच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.

Jalgaon Accident : एसटी संपामुळे विद्यार्थीनीचा हकनाक बळी; ओव्हरलोड रिक्षातून दोघी पडल्या; डोक्याच्या चिंधड्या उडून एकीचा मृत्यू
ओव्हरलोड रिक्षातून दोघी पडल्या; डोक्याच्या चिंधड्या उडून एकीचा मृत्यू Image Credit source: TV 9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 4:46 PM

जळगाव : एसटी बंद असल्यामुळे याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. याचेच उदाहरण म्हणजे जळगावातील विद्यार्थीनीचा अपघाती मृत्यू. धावत्या रिक्षेतून तोल गेल्याने अकरावीमधील 17 वर्षीय विद्यार्थिनी (Student) खाली पडली. या अपघातात तिच्या मेंदूला गंभीर इजा झाली. यानंतर जळगावला नेताना वाटेतच तिचा मृत्यू (Death) झाल्याची घटना गुरुवारी घडली. तृप्ती भगवान चौधरी असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. एसटी बंद असल्यामुळे तृप्ती रिक्षाने महाविद्यालयात ये जा करत होती. हाच रिक्षाचा प्रवास तिच्यासाठी जीवघेणा ठरला आहे. (Eleventh class student dies after falling from overloaded rickshaw in Jalgaon)

अकरावी विज्ञान शाखेत शिकत होती तृप्ती

तृप्ती चौधरी ही विद्यार्थिनी बोदवड येथील न.ह.रांका कॉलेजमध्ये अकरावी विज्ञान शाखेला शिकत होती. ती एसटीने प्रवास करायची मात्र गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरु असल्याने एसटी बंद आहे. त्यामुळे तृप्ती रिक्षानेच महाविद्यालयात ये जा करत होती. कॉलेजची वेळ सकाळी 7.30 ते 9.30 पर्यंत असल्याने ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयात आली. कॉलेज सुटल्यानंतर मैत्रिणींसोबत शेलवड येथे घरी ऑटोरिक्षाने निघाली. यावेळी ती प्रवासी वाहतूक करणार्‍या खाजगी रिक्षाच्या पुढील सीटवर बाहेरील बाजूने बसली होती.

हात निसटून तोल गेल्याने दोघी मैत्रिणी रिक्षातून पडल्या

प्रवासात अचानक हात निसटून तोल गेल्याने तृप्ती व तिची मैत्रिण रोहिणी राजेंद्र धनगर या दोन्ही धावत्या रिक्षातून खाली पडल्या. तृप्ती बाहेरच्या साईडने असल्याने तिच्या डोक्याला व मेंदूला गंभीर मार लागला. यानंतर तिला तातडीने बोदवड येथील डॉ.यशपाल बडगुजर यांच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. पण, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी जळगावला हलविण्याचा सल्ला दिला. जळगावला नेत असताना वाटेतच तृप्तीची प्राणज्योत मालवली. जळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर तृप्तीवर दुपारी 4 वाजता शेलवड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

खाजगी वाहतूकदार क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवतात

विद्यार्थ्यांसाठी एसटी दिवसभरातून 21 फेऱ्या करायची. मात्र, कोरोनानंतर शाळा-महाविद्यालये सुरू होताच 8 नोव्हेंबरला एसटीचा संप सुरू झाला. परिणामी सर्व विद्यार्थ्यांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. अनेक खासगी वाहतूकदार क्षमतेपेक्षा जास्त किंवा फ्रंट सीट बसवून वाहने चालवतात. याच पद्धतीने प्रवास करणे शेलवड येथील तृप्तीच्या चौधरीच्या जीवावर बेतले. कदाचित एसटीचा संप सुरू नसता तर ही दुर्घटना घडली नसती. (Eleventh class student dies after falling from overloaded rickshaw in Jalgaon)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.