हातात फुटलेल्या बॉम्बमधून बचावला, कोल्हापुरात माजी सैनिकाचा ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू

माजी सैनिक सर्जेराव पांडुरंग कुरणे यांचा शनिवारी सकाळी ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू झाला. (Army Oxygen Cylinder in Kolhapur)

हातात फुटलेल्या बॉम्बमधून बचावला, कोल्हापुरात माजी सैनिकाचा ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू
दुसऱ्या लाटेवेळी ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 12:58 PM

कोल्हापूर : कोल्हापुरात माजी सैनिकाचा ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू झाला. करवीर तालुक्यातील गिरगाव येथील 41 वर्षीय सर्जेराव पांडुरंग कुरणे यांचं निधन झालं. हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपल्याने कुरणे यांना प्राण गमवावे लागल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आक्रमक झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं. (Ex Army man Dies after lack of Oxygen Cylinder in Kolhapur Girgaon)

माजी सैनिक सर्जेराव पांडुरंग कुरणे यांचा शनिवारी सकाळी ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू झाला. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. दररोज एक हजाराहून अधिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद जिल्ह्यात होत आहे. उपचाराअभावी रुग्णांचे बळी जाण्याची मालिका सुरुच आहे.

 सैन्यात सरावादरम्यान हातात बॉम्ब फुटला

सर्जेराव कुरणे यांनी सैन्य दलात चांगली कामगिरी बजावली होती. सरावादरम्यान त्यांच्या हातात बॉम्ब फुटला होता. अतिशय धाडसी आणि मनमिळावू स्वभावाचे सर्जेराव कुरणे प्रत्येकाच्या अडी-अडचणीला धावून जाण्यासाठी प्रसिद्ध होते.

ऑक्सिजनची पातळी खालावली

माजी सैनिक सर्जेराव पांडुरंग कुरणे यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यावर रंकाळा टॉवर परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची ऑक्सिजनची पातळी खालावल्याने त्यांना ऑक्सिजन लावला होता. शनिवारी हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपल्याने शेजारच्या रुग्णालयातील ऑक्सिजन लावण्याचा प्रयत्न हॉस्पिटल प्रशासनाने केला.

रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीचा आरोप

रुग्णालय प्रशासनाची हलगर्जी कुरणेंच्या जीवावर बेतल्याचा आरोप केला जात आहे. अन्यत्र हलवून कुरणेंना ऑक्सिजन लावण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. ऑक्सिजन न मिळाल्याने कुरणेंना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांच्या नातेवाईकांनी याबाबत विचारणा केली. मात्र शेवटपर्यंत ऑक्सिजन मिळालाच नाही. अखेर तडफडूनच सर्जेराव पांडुरंग कुरणे यांनी प्राण सोडले.

कुरणेंचे नातेवाईक आक्रमक

त्यांच्या निधनानंतर कुरणेंचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. याबाबतची तक्रार महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. कुरणे यांना ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीमुळे रुग्णाला प्राण गमवावे लागल्याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या :

Video : ऑक्सिजनची कमतरता, रुग्ण मृत्यूच्या दाढेत, रुग्णालयाचे हतबल सीईओ ढसाढसा रडले!

VIDEO: रुग्णालयात फक्त 3 तास पुरेल इतका ऑक्सिजन शिल्लक; मृत्यूशी लढणाऱ्या आप आमदाराची आर्त हाक

(Ex Army man Dies after lack of Oxygen Cylinder in Kolhapur Girgaon)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.